शरद पवार यांची गुगली आणि सिक्सर, संजय राऊत यांची पहिलीच प्रतिक्रिया; ‘त्या’ घटनेचीही दिली आठवण

| Updated on: Jun 30, 2023 | 10:48 AM

भाजप नेते त्यांच्याशी चर्चा करत असल्याचं शरद पवारांनी आम्हाला सांगितलं होतं. आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत. पण महाविकास आघाडीचचं सरकार होईल, असंही पवारांनी सांगितलं होतं.

शरद पवार यांची गुगली आणि सिक्सर, संजय राऊत यांची पहिलीच प्रतिक्रिया; त्या घटनेचीही दिली आठवण
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. शरद पवार यांच्या पुढाकारानेच भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू झाली होती. पवारांनीच पुढाकार घेतला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी करून पवार यांची कोंडी केली. तर माझे सासरे क्रिकेटपटू होते. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. मलाही गुगली कशी टाकायची माहीत आहे. त्यामुळे मी गुगली टाकली. सिक्सर मारला आणि भाजपवाले क्लिन बोल्ड झाले, असं पवार म्हणाले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही धक्कादायक माहिती देत भाजपची विकेट घेतली आहे.

संजय राऊत मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांनी त्या काळातील घटना घडामोडींवर भाष्य केलं. तसेच शरद पवार यांची खेळी कशी बरोबर आहे हे सुद्धा सांगितलं. तसेच राज्यातील राष्ट्रपती राजवटीचीही आठवण करून दिली. शरद पवारांनी जे सांगितलं ते शंभर टक्के सत्य आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट कशी निघेल याबाबत आम्ही चिंतेत होतो. आपण बहुमताचा आकडा सिद्ध केला तरी राज्यपाल बहुमत मानणार नाही. ते वेळकाढूपणा करतील. केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट काढणार नाही. ते झुलवत ठेवतील यावर आमच्या वारंवार चर्चा झाल्या. एका भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. ही पवार यांची गुगली आणि सिक्सर दोन्ही होतं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

फडणवीस तीन वर्षापासून रडत आहेत

शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांना शंभर जन्म घ्यावे लागतील असं मी म्हटलं होतं. त्यावर माझ्यावर टीका झाली. मी माझ्या मतावर आजही ठाम आहे. पवारांनी ही गुगली टाकली नसती किंवा हा सिक्सर मारला नसता तर राज्यातील राष्ट्रपती राजवट कायम राहिली असती. एखादं खोके सरकार येईपर्यंत ही राष्ट्रपती राजवट कायम राहिली असती. बहुमताला त्यांनी मान्यता दिली नसती. पवारांच्या गुगलीवर फडणवीस आणि त्यांचा पक्ष क्लिनबोल्ड झाला. फडणवीसांची विकेट गेल्याने तीन वर्षापासून ते रडत आहेत. त्या झटक्यातून ते बाहेर पडले नाहीत. मी ते तोंडावर पडले असं म्हणणार नाही. राजकारणात असं घडत असतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मोदींना स्पष्ट सांगितलं

यावेळी राऊत यांनी पवार आणि मोदी भेटीची आठवणही करून दिली. भाजप नेते त्यांच्याशी चर्चा करत असल्याचं शरद पवारांनी आम्हाला सांगितलं होतं. आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत. पण महाविकास आघाडीचचं सरकार होईल, असंही पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर पवार दिल्लीत गेले. पंतप्रधानांना भेटले. भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार होणार नाही. आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार स्थापन करत आहोत, असं पवारांनी मोदींना सांगितलं होतं. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत, असंही राऊत म्हणाले.