मुंबई : दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र (Bhaskar) समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाचे जोरदार छापे पडले आहेत. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडावेत याचे आश्चर्य वाटते. कोरोना मृत्यूच्या आकडयात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’ चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असेल तर ते भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रावर टीका केली आहे. तसंच आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? असा संतप्त सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला.
कोरोना मृत्यूच्या आकडयात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’ चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असेल तर ते भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे. गेल्या पाच वर्षांत देशातल्या 7 प्रमुख क्षेत्रांत 3.64 कोटी लोक बेरोजगार झाल्याचा लेखाजोखा ठळकपणे मांडणाऱ्या ‘भास्कर’ ला सरकारी दमनचक्राखाली दडपून मारता येईल असे कुणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत.
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अधिकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. अशा दडपशाहीविरुद्ध प्रत्येकानेच उभे राहिले पाहिजे. त्याच्याशी ‘सामना’ केला पाहिजे . ‘भास्कर’ ने लढण्याचा निर्धार केला आहे तसा ‘भारत समाचार’ ने केला आहे. आज दै . ‘भास्कर’, ‘भारत समाचार’ जात्यात आहे. सुपात जे सुरक्षित आहेत त्यांनी जात्यात पडण्याची वाट पाहू नये.
दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाचे जोरदार छापे पडले आहेत. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडावेत याचे आश्चर्य वाटते.
‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरण गाजत आहे. देशातील 30 पत्रकारांवर पेगॅससच्या माध्यमांतून पाळत ठेवण्यात आली. त्यावरही गदारोळ सुरू झाला आहे. आता वृत्तपत्रांवर छापेही पडले. याआधी असे छापे ‘एनडी टीव्ही’ या वृत्तवाहिनीवर टाकून सरकारने दहशत निर्माण केली होती.
‘भास्कर’ या वृत्तसमूहाचा व्याप मोठा आहे. देशभरात त्यांच्या आवृत्त्या निघतात व त्या लाखोंनी संपतात. हिंदी भाषिक पट्ट्यांत ‘भास्कर’चे जनमानसावर वजन आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक विकले जाणारे वर्तमानपत्र असा दै. ‘भास्कर’चा लौकिक आहे. दै. ‘भास्कर’मधील वार्तांकन हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ, पारदर्शक व तप्त असते. ते संयमी तितकेच सत्यवादी असते. सरकारपुढे झुकण्याची व याचक म्हणून दारात उभे राहण्याची त्यांची परंपरा नाही. थोडक्यात, इतर ‘माध्यमां’प्रमाणे ते सरकारचे मिंधे झाले नाही. त्यांनी कोणत्याही सरकारवर अवाजवी टीका केली नाही व गुडघे टेकले नाहीत.
बहुधा ‘भास्कर’ किंवा ‘भारत समाचार’चे हे कृत्य कोणाला राजद्रोही वाटले असेल व त्यामुळे त्यांच्या कार्यालयांवर देशभरात छापे मारून वृत्तपत्र क्षेत्रात दहशत माजविण्याचा प्रयोग सुरू केला गेला आहे. असे झाले असेल तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत.
आणीबाणी इंदिरा गांधींनी आणली हे खरे, पण त्या व्यवस्थेचा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पडद्यामागे सूत्रे हलविणारे दुसरेच कोणीतरी चांडाळचौकडीचे लोक होते. त्यांच्यामुळे इंदिरा गांधी पुरत्या बदनाम झाल्या. आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? देशभरातील अनेक वृत्तपत्रांवर तेव्हा छापे टाकले गेले. अनेक नियतकालिकांना सरकारकडून टाळे मारण्यात आले. त्यात आपले ‘मार्मिक’ही होते. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप लादली. ‘इंडियन एक्प्रेस’ समूह व त्यांचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या कार्यालयांवर देशभरात छापे मारून त्रास देण्यात आला, पण गोएंका कोणत्याही दडपशाहीपुढे झुकले नाहीत व त्यांनी त्यांचा लढा सुरूच ठेवला.
दैनिक ‘भास्कर’चे सर्वेसर्वा श्रीमान अग्रवाल यांनीही छापेमारीची पर्वा न करता यापुढेही सत्यासाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. अग्रवाल यांनी परखडपणे सांगितले, ‘आमचा गुन्हा काय? आम्ही फक्त सत्य सांगितले. आम्ही आमचे काम केले. गंगेत वाहत येणाऱ्या प्रेतांपासून कोरोनामुळे झालेल्या मयतांचे खरे आकडे देशासमोर मांडले. आम्ही फक्त इतकेच केले.’ हे सत्य सांगितल्यामुळेच ‘भास्कर’चा तळपता सूर्य झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे काय?
‘भास्कर’शी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरी छापे मारून त्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप जप्त केले. ‘भास्कर’ समूहाने करचोरी केली असा आरोप ठेवला आहे, तो खरा आहे असे एकवेळ मान्य केले तरी वृत्तपत्रांवर असे सरकारी हल्ले करून एकप्रकारे दहशत माजविण्याचाच प्रकार आहे. चौकशी व तपास ‘dignified’ पद्धतीने होऊ शकतो, पण अशा प्रकरणात राजकारण घुसले की हे प्रकार घडतात.
राजकीय विरोधकांना ईडी, सीबीआयच्या माध्यमांतून छळले जात आहेच, आता सत्य लिहिणाऱ्या वृत्तपत्रांची ‘नखे’ उपटली जात आहेत. गंगेतून कोरोनाग्रस्तांची प्रेते वाहत आली तेव्हा त्यांचे पानभर छायाचित्र छापून त्यावर ‘भास्कर’ने शीर्षक दिले- ‘शर्मसार हुई गंगा!’ ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा श्वास कसा गुदमरत आहे ते याच ‘भास्कर’ने समोर आणले. मध्य प्रदेशात एप्रिल महिन्यात ऑक्सिजनअभावी 15 दुर्घटनांत 60 मृत्यू झाल्याचे ‘भास्कर’ने छापले. केंद्र सरकारचा दावा त्याने फोल ठरला. गुजरातमध्ये एका महिन्यात कोरोनामुळे 3,578 मृत्यू झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.
‘भास्कर’ने एक्सपोज केले की, अहमदाबादमध्येच या काळात 3,416 मृत्यू झाले. कोरोना मृत्यूच्या आकडय़ात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असेल तर ते हिंदुस्थानी स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे. गेल्या पाच वर्षांत देशातल्या 7 प्रमुख क्षेत्रांत 3.64 कोटी लोक बेरोजगार झाल्याचा लेखाजोखा ठळकपणे मांडणाऱ्या ‘भास्कर’ला सरकारी दमनचक्राखाली दडपून मारता येईल असे कुणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत.
लोकशाहीत चर्चा होऊ शकते. काही काळ हुकूमशाहीची उबळ येऊ शकते, सरकारी तपासयंत्रणांचा वापर करून विरोधकांचा छळही तुम्ही करू शकता, पण हुकूमशाही प्रवृत्तीचा तो अंतिम विजय नसतो. अंतिम विजय शेवटी सत्यासाठी संघर्ष करणाऱ्यांचाच होतो हे अनेकदा याच देशात सिद्ध झाले आहे.
आज शेतकऱ्यांना न्याय नाकारला जातोय, पत्रकारांवर पाळत ठेवली जातेय आणि वृत्तपत्रांना बंधक बनवले जात असेल तर लोकशाहीवर कुणीतरी मारेकरी घातले आहेत काय? अशी शंका पक्की होते. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अधिकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. अशा दडपशाहीविरुद्ध प्रत्येकानेच उभे राहिले पाहिजे. त्याच्याशी ‘सामना’ केला पाहिजे. ‘भास्कर’ने लढण्याचा निर्धार केला आहे तसा ‘भारत समाचार’ने केला आहे.
‘ तुम चाहो जितना दबाओंगे आवाज, हम उतनी ही जोर से कहते रहेंगे सच, हम न तो पहले डरे थे और न अब डरेंगे, सच के सत्य पहले भी थे और अभी भी है!’ हे ‘भारत समाचार’ने सांगितले ते प्रेरणादायी आहे. आज दै. ‘भास्कर’, ‘भारत समाचार’ जात्यात आहे. सुपात जे सुरक्षित आहेत त्यांनी जात्यात पडण्याची वाट पाहू नये, असा इशारा देखील अग्रलेखातून देण्यात आला आहे.
(Sanjay Raut Slam Modi GOVT Over Income Tax Department raids on Bhaskar through Saamana Editorial)
हे ही वाचा :