कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचं आंदोलन? मनसे-भाजपवर राऊतांचा निशाणा?

| Updated on: Nov 20, 2020 | 11:33 AM

वाढीव वीजबिलाच्या माफीवरून भाजप आणि मनसेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्यावरून शिवसेनेने या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. (sanjay raut slams bjp and mns over power bill issue)

कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचं आंदोलन? मनसे-भाजपवर राऊतांचा निशाणा?
Follow us on

नवी दिल्ली: वाढीव वीजबिलाच्या माफीवरून भाजप आणि मनसेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्यावरून शिवसेनेने या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. ऊर्जा विभागातील थकबाकीला भाजप सरकारच जबाबदार असल्याचं सांगून कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचं आंदोलन होत आहे?, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेला लगावला आहे. (sanjay raut slams bjp and mns over power bill issue)

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना संजय राऊत यांनी हा टोला लगावला. मागील सरकारच ऊर्जा विभागातील थकबाकीला जबाबदार आहे. परंतु, आम्ही केवळ आरोप करणाऱ्यांपैकी नाही. थकबाकी वसूल झाली तर जनतेला नक्की दिलासा देऊ, असं सांगतानाच कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून भाजप आंदोलनाची भाषा करत आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन नाही

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या मानसिकतेत मुख्यमंत्री नाहीत, असं सांगतानाच परिस्थिती नियंत्रणात असली तरी राज्यातील जनतेने सर्व नियमांचे पालन केले पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केले.

भगवा लाहोरला फडकवा

यावेळी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याची भाषा करणाऱ्या भाजपवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं. तुमचा आणि आमचा भगवा काय वेगळा आहे का? असा सवाल करतानाच भगवा फडकवायचाच असेल तर बेळगाव, काश्मीर आणि लाहोरमध्ये फडवा, असं आव्हानच राऊत यांनी भाजपला दिलं. बेळगाव पालिकेवरून भगवा खाली उतरला तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? देशात बऱ्याच जागा आहेत, तिथे भगवा फडकवा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सांगतानाच हा संघर्षाचा भगवा आहे. शिवाजी महाराजांचा भगवा आहे. ज्यांनी ज्यांनी भगव्याला हात लावला ते महाराष्ट्रातून नष्ट झाल्याचा इतिहास आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

‘मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर…’ शिवसेनेचा भाजपला इशारा

LIVE | शिवसेनेच्या भगव्यात भेसळ, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना, फडणवीसांची जळजळीत टीका

शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी, ठाकरे सरकारचा निर्णय

(sanjay raut slams bjp and mns over power bill issue)