संजय राऊत यांचे पुन्हा ट्विट, मकाऊ की रातें..पिक्चर अभी बाकी है…

| Updated on: Nov 24, 2023 | 1:18 PM

chandrashekhar bawankule and sanjay raut | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात वाद कमी होणार नसल्याची चिन्ह दिसत आहे. संजय राऊत यांनी मकाऊमधील पुन्हा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. मकाऊ की रातें..पिक्चर अभी बाकी है..., असे ट्विट त्यांनी केले आहे.

संजय राऊत यांचे पुन्हा ट्विट, मकाऊ की रातें..पिक्चर अभी बाकी है...
sanjay raut
Follow us on

मुंबई, 24 नोव्हेंबर 2023 : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. तीन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत त्यांनी महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…असे म्हटले होते. परंतु भाजपने हे सर्व आरोप फेटाळले होते. चंद्रशेखर बावनकुळे कुटुंबासह हॉटेलमध्ये थांबले असल्याचे म्हटले होते. आता पुन्हा संजय राऊत यांनी मकाऊतील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातून चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष केले आहे. पिक्चर अभी बाकी है, असे म्हणत संजय राऊत यांनी 6 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला.

पहिल्या टि्वटनंतर वाद

मकाऊतील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कॅसिनोतील फोटो शेअर केल्यानंतर भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या आरोप-प्रत्यारोप झाले. त्यावेळी राऊत यांनी असे २७ फोटो आणि पाच व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर एक तरी फोटो दाखवा, असे आव्हान भाजपकडून मोहीत कंबोज यांनी दिले. आता शुक्रवारी संजय राऊत यांनी पुन्हा सहा सेंकदाचा व्हिडिओ शेअर केला. मकाऊ की रातें.., पिक्चर अभी बाकी है..असे कॅप्शन देत ते @BJP4Maharashtra, @AUThackeray, @Dev_Fadnavis, @ShivSenaUBT_, @supriya_sule यांना टॅग केला आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार भास्कर जाधव आक्रमक झाले.

हे सुद्धा वाचा

भाजप कारवाई करणार नाही- भास्कर जाधव

भाजप कारवाई करणार नाही, संजय राऊत यांच्याकडे अनेक पुरावे आहेत. राऊत यांनी कितीही आदळआपट केली तरी भाजप कारवाई करणार नाही. कारण भाजप गेंडाच्या कातडीचा पक्ष आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी संजय राऊत यांच्या नव्या टि्वटनंतर सांगितले. यापूर्वी किरीट सोमय्या यांचे व्हिडिओ सर्व राज्याने पाहिले. त्यांच्यावर कुठे काय कारवाई झाली, असे त्यांनी म्हटले. यामुळे आता संजय राऊत आणि भाजप हा वाद सुरुच राहणार असल्याचे दिसत आहे.