मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती दिनी भाजपवर शेलक्या शब्दात हल्ला चढवला. महाराष्ट्रासह केंद्रीय भाजप नेतृत्वावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ठाकरे यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खास पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली. फडणवीस यांनी ठाकरेंचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत भाजपला जोरदार टोला हाणलाय. राऊतांच्या या ट्वीटवरुन आता भाजपच्या खासदार पुनम महाजन (Poonam Mahajan) यांनी राऊतांना शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे एका चित्रावर बसले असून त्यांनी दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवले आहे. तसंच बाजूला एक स्टूलही आहे. त्यावेळी तिथे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन उभे असतात. बाळासाहेब त्यांना ‘Have a Seat’ म्हणून बसण्यास सांगतात. असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय. हे व्यंगचित्र शेअर करताना ‘कोण कुणामुळे वाढले? उघडा डोळे.. बघा नीट’ असं कॅप्शन दिलं आहे.
कोण कोणामुळे वाढले?
उघडा डोळे..बघा नीट.. pic.twitter.com/hGy2mGU5zP— Sanjay Raut (@rautsanjay61) January 24, 2022
राऊतांनी ट्वीट केलेल्या या व्यंगचित्रावरुन भाजप खासदार पुनम महाजन यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊतांच्या या ट्वीटला रिट्वीट करत पुनम महाजन यांनी ‘स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्यांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका’, असं प्रत्युतर दिलंय.
स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती.
नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका. https://t.co/dK8l81ZLub— Poonam Mahajan (@poonam_mahajan) January 24, 2022
तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणात काहीच नव्हते, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची शिवसेना नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. मिरच्या झोंबल्या, ठसका लागला, बांबू लागला म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला ना? नाही तर एवढी मोठी पत्रकार परिषद कशाला घेतली असती?, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलीय.
दरम्यान, राम मंदिर आंदोलनानंतर आम्हाला देशात अनुकूल वातावरण होतं. आम्ही लढलो असतो तर दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला असता असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना राम मंदिर आंदोलनानंतर शिवसेनेने उत्तर प्रदेशात लढवलेल्या प्रत्येक निवडणुकीची आकडेवारी दाखवत शिवसेना कशी अपयशी ठरली हे पुराव्यानिशी स्पष्ट केलं आहे.
इतर बातम्या :