मुंबई – शिवसेनेत (Shivsena) आमदारांनी बंड केल्यापासून एकमेकांवरती आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. बंड केल्यापासून शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा अस्थिर आहेत. शिंदे गटात अधिक आमदार असल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्ते सुद्धा आता शिंदे गटाकडे वळायला सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मीरा भाईंदरमधील काल 18 नगरसेवक शिंदे गटात सामील केले. पालिकेच्या निवडणुकीच्या आगोदर अधिक नगरसेवक शिंदे गटात सामील होतील असा अंदाज आहे. 38 वर्षांपासून शिवसेनेत आहे, बाळासाहेब होते त्यावेळी शिवसेनेचा उमेदवार हरला तर ते फक्त एक ग्लास दूध प्यायचे. पण आज काही लोक रोज सकाळी उठून शरद पवारांकडे जातात अशी टीका संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी राऊतांवरती केली आहे.
रात्री सभा घेण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.यामिनी जाधव यांना कॅन्सर आहे. मी रिक्षाचालक आमचे मुख्यमंत्रीही रिक्षाचालक, तुमच्याकडे इनकमिंग आहे. ही माणसे आउट-गोइंग आहेत. देणारे लोक आहेत. हेच आजच्या मोलाचे कारण आहे, शिंदे साहब तुम आगे बढ़ी हम तुम्हारे साथ है असं देखील बोलत असताना संजय शिरसाठ म्हणाले.
मतदारांनी आपल्याला खऱ्या अर्थांने प्रेम दिले. त्यांच्या जीवावर आम्ही निवडून आलो आहोत. मतदारांनी शिवसेना मोठी केली आहे. काही लोक रोज टिव्हीवर बोलतात त्यांना काय बोलाव हेच कळत नाही अशी टीका शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
ज्यांची बायको ऐकत नाही ते म्हणतात निवडणून येणार नाही. आंबादास दानवे यांचा आपल्याला बदला घ्यायचे आहे असं त्यांनी दानवे यांच्यावरी टीका केली. त्याबरोबर त्यांच्या किती बायका असा टोला देखील त्यांनी लगावला. त्यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर ते बघत देखील नव्हते. एखादेवेळेस निधी मागायला गेल्यानंतर दहा टक्के निधी मागत होते अशी टीका सुभाष देसाई यांच्यावर केली. एक जन रोज शरद पवार यांचे गुण गाण गात सुटले आहेत.पण रात्रीची सभा घेण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. यामिनी जाधव आजारी आहेत म्हणून त्यांनी कोणी विचारत नव्हते अशी टीका देखील त्यांनी नाव न घेता काही नेत्यांवरती केली.