आनंद दिघे यांच्या फक्त पायाला इजा झाली होती. दोन तासानंतर डिस्चार्ज होणार होता. डिस्चार्ज कार्डही तयार होतो. त्यांना भेटायला सर्व नेते गेले असता हसून खेळून बोलले. मग अचानक त्यांना अटॅक येण्याचं कारण काय? इंजेक्शनमध्ये काही दिलं होतं असा काही लोकांनी डाऊट व्यक्त केला. तिथल्या शिवसैनिकाला काय झालं ते समजायला पाहिजे होतं ना !. सिंघानिया हॉस्पिटल आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर बंद आहे. ते आजतागायक बंद आहे. एवढी इमोशनल घटना झाल्यानंतर हॉस्पिटल शिफ्ट होतं, ही शंका घ्यायला वाव आहे. असं असेल तर जो शिवसैनिक दिघे साहेबांच्या नावावर मोठा झाला, त्यांच्यामुळे लाखो लोकांचे कुटुंब वसलेले आहेत, त्यांच्या मृत्यूची माहिती शिवसैनिकांना मिळायला नको का? नेमकं काय झालं हे समजायला नको का?, असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. आनंद दिघे गेले हे शिवसैनिकांच्या मनाला पटतच नव्हतं. ज्यांना दोन तासानंतर डिस्चार्ज द्यायचा आहे, डिस्चार्ज पेपर तयार होत आहेत आणि दोन तासानंतर बातमी येते की दिघे साहेब गेले. कसं शक्य आहे हे? बोलता बोलता गेले म्हणजे डिस्चार्ज कार्ड तयार होतंय आणि माणूस एक्सपायर होतो हे शिवसैनिकांच्या मनाला पटणार नव्हतं. म्हणून उद्रेक झाला. घातपात झाला होता का? ही माझी शंका होती, असं संजय शिरसाट म्हणाले.
त्या काळात आनंद दिघे यांच्या आजूबाजूला अनेक लोक होते. त्यापैकी अनेकांच्या चर्चा आहेत. मी पर्टिक्युलर कुणाचं नाव घेत नाही की यांच्यामुळे मारलं की मारलं असावं. ठाण्यामध्ये त्यांचे वर्चस्व होतं हे निर्विवाद सत्य आहे. लोक त्यांना देव समजायचे. साधा टपरीवाला असो किंवा मोठा माणूस त्यांच्या घरामध्ये आनंद दिघे यांचा फोटो असायचा. दिघे साहेब आमचे दैवत आहेत, असं मानणारा वर्ग आजही ठाण्यात आहे. जोडलेली नाळ पाहता त्यांची चौकशी व्हायला हवी अशी माझी मागणी राहील, काय जे असेल खरं खोटं एकदा लोकांसमोर येऊ द्या. आजही दिघे साहेबांचं नाव घेतलं तर अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. ते रडतात, असं संजय शिरसाट म्हणाले.
ठीक आहे साहेबांचं वर्चस्व जे काही प्रस्थापित होत होतं ते अनेकांना खटकत होतं. हे तेवढेच सत्य. त्यांच्या मागे कोण असेल हे कळेलच. जर दिघे साहेबांचा मृत्यू घडवला असेल, त्याच्या मागे कोणी ना कोणी असणार आहे. ज्याच्या हातून घडवला तो सांगेल कोणी सांगितलं होतं, असंही शिरसाट यांनी सांगितलं.
आनंद दिघेंचं वर्चस्व बाळासाहेबांना खटकण्याचा काही प्रश्न येत नाही. बाळासाहेबांचे ते तर खासच होते. बाळासाहेबांकडे गेले आणि कोणते काम झालं नाही असं नाही. कोण होते त्याच्यामागे हा एक प्रश्न उपस्थित होतो. वयाच्या पन्नासाव्या वर्षी चांगला धडधाकट असलेला माणूस पायाला लागतं आणि अटॅक न जातो हे मनाला पटत नाही. आनंद दिघे जेव्हा जिल्हाप्रमुख होते, तेव्हा मी 17 वर्षे उपजिल्हा प्रमुख होतो. दहीहंडी असेल किंवा इतर कार्यक्रम असतील त्यामध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले आहे, असंही त्यांनी सांगितलं.
केदार दिघे हा आता जन्मलेला माणूस आहे. या उबाठा गटाने त्याला उभा केला आहे. हे नाव सुद्धा आम्ही कधी ऐकलं नव्हतं. हे सो कोल्ड नातेवाईक आताचे काही तयार झाले आहेत. त्यांना दिघे साहेबांचं काही घेणं देणं नाही. दिघे साहेबांच्या मृत्यूच्या चौकशीची खरी मागणी त्यांनी करायला पाहिजे होती. त्यांच्याकडून हे वक्तव्य यायला पाहिजे होतं. माझ्यासारखा मागणी करतोय. मात्र जे नातेवाईक आहे ते गप्प बसले आहेत. याचं कारण काहीतरी असू शकतं, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
चित्रपटात जे दाखवल ती वास्तविकता आहे. लोक आग लावत होते. कुणी सिलेंडर घेऊन फिरत होते, दिघे साहेबांचं काय? रुग्णालयात हजारो रुग्ण होते. काही लोकांनी अडवण्याचे काम केलं. दिघे साहेबांना बाहेर काढलं तर ते वाचतील, तिथं ढिगारा साचला असता. दिघे साहेबांना बाहेर काढायचं म्हणून प्रयत्न केले होते. एकनाथ शिंदे साहेबांसोबत अनेक लोक होते. फक्त शिंदे साहेब होते असं नाही. सत्यता नाकारून चालत नाही, असंही त्यांनी सांगितलं.