‘काय झाडी, काय डोंगर’ नंतर शहाजीबापूंच्या फिटनेसची चर्चा, 8 दिवसात 9 किलो वजन कसं कमी केलं?

| Updated on: Jan 02, 2023 | 2:45 PM

वाढलेलं वजन घटवणं अनेकांसमोरील आव्हान आहे.त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी 8 दिवसात 9 किलो वजन घटवलं, नेमकं कसं? वाचा...

काय झाडी, काय डोंगर नंतर शहाजीबापूंच्या फिटनेसची चर्चा, 8 दिवसात 9 किलो वजन कसं कमी केलं?
Follow us on

बंगळुरू : आपण सगळेच आपल्या फिटनेसकडे (Fitness )विशेष लक्ष देत असतो. वाढतं वजन ही दिवसेंदिवस वाढत चाललेली समस्या आहे. सध्याच्या बिझी शेड्यूलमुळे आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं मोठा टास्क आहे. त्यातही वजन वाढलं असेल तर ते कमी करण्यासाठी नानाविध उपाय करूनही फरक जाणवत नाही. पण शिंदेगटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil Lost Weight) यांनी हे आव्हान लिलया पेललं आहे.

शहाजीबापूंनी अवघ्या आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केलं आहे. मागील दहा दिवसांपासून शहाजीबापू पाटील बंगळुरुमध्ये मुक्कामी होते. तिथे त्यांनी उपचार घेतले. अन् नऊ किलो वजन कमी केलं आहे.

श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमामध्ये त्यांनी उपचार घेतले. तिथं त्यांच्यावर पंचकर्म करण्यात आलं. यातून त्यांचं 9 किलो वजन कमी केलं आहे.

या उपचारानंतर शहाजीबापू आज सांगोल्यात परतणार आहेत. त्यामुळे शहाजीबापू आता नव्या रूपात पाहायला मिळतील.

अवघ्या आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांच्या या बदलाचं अनेकांनी कौतुक केलंय.

शहाजीबापू म्हणजे भारदस्त व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. पण आता त्यांनी स्वत:मध्ये घडवून आणलेला बदल आश्चर्यकारक आहे.

शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. ‘काय झाडी, काय डोंगर’या डायलॉगने तर शहाजीबापूंना विशेष ओळख दिली. आता शहाजीबापू वजन घटल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी स्वत:मध्ये केलेला हा बदल अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे.

सगळेच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात. वजन घटवणं हे अनेकांसमोरचं चॅलेंज आहे. त्यांच्यांसाठी शहाजीबापू एक उदाहरण म्हणून समोर आहेत.