Shahajibapu Patil : मोडीतली भांडी आता खडबाड करत आहेत, शहाजीबापू पाटलांचं विरोधकांना उत्तर

| Updated on: Aug 21, 2022 | 5:56 PM

पंचायत समिती आणि इतर यंत्रणा 65 वर्षे झाले शेकापची आहे. तरीही माझ्याकडे आलेल्या तक्रारीचा निपटारा करतो. काही गावांना माझ्याकडे यायला अपमान वाटतो असं शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं.

Shahajibapu Patil : मोडीतली भांडी आता खडबाड करत आहेत, शहाजीबापू पाटलांचं विरोधकांना उत्तर
शहाजीबापू काय म्हणाले?
Follow us on

पंढरपूर – गेले एक महिना माझ्यावर टीका करण्यासाठी मातोश्रीतून (Matoshree) शोध सुरू होता. यानंतर आज गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आज सांगोल्यात (Sangola) आले आहेत. मोडीतली भांडी आता खडबाड करत बाहेर येत आहेत. राजकारणात सुगीचे दिवस आलेत अशी टीका त्यांनी विरोधकांवरती केली. तालुक्यात विकास आणि दुष्काळ घालवण्यासाठी राजकारणात (Politics) आहे. पाणी प्रश्न सक्रिय आहे. म्हैसाल टेंभूसाठी नवी गावे प्रस्थापित आहे. पाण्यासाठी कोकणातून येऊन आम्हाला कुणी सांगू जये. लवकरच सांगोला सुकाळ तालुका असेल. खा. विनायक राऊत यांनी अधिकारी वर्गाकडे जरा चौकशी करावी. पंचायत समिती आणि इतर यंत्रणा 65 वर्षे झाले शेकापची आहे. तरीही माझ्याकडे आलेल्या तक्रारीचा निपटारा करतो. काही गावांना मझ्याकडे यायला अपमान वाटतो असं शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं.

संजय शिरसाट नाराज नाहीत ; अतुल सावे यांना भाजपाने मंत्री केले

संजय शिरसाट नाराज नाहीत, अतुल सावे यांना भाजपाने मंत्री केले आहे. माझ्यावर प्रेम करणारे कुणीही सेनेच्या मेळाव्याला नाही. पंढरपूर, पुणे आणि सोलापुरसह परगावचे लोक आलेत सांगोल्याच्या मेळाव्याला असंही त्यांनी आवर्जुन सांगितले. विक्रमी विकास झालेला सांगोला मतदारसंघ येत्या निवडणुकीवेळी पुराव्यानीशी दाखवेन. सेनेच्या मेळाव्याला 10 टक्के तालुक्यातील तर 90 टक्के भाड्याचे लोक होते अशी टीका त्यांनी विरोधकांवरती केली.

हे सुद्धा वाचा

शहाजीबापू पाटलांवर नाव न घेता टीका खासदार विनायक राऊत यांनी टीका

आज दोन पॅक जास्त मारणार शहाजीबापू पाटलांवर नाव न घेता टीका खासदार विनायक राऊत यांनी टीका केली. तमाशा करणाऱ्यांसाठी माणूस मिळाला. मिमिक्री करत हा माणूस नवी मुंबई, ठाणे, वगैर, सध्या महाराष्ट्रात काळू बाळूचा खेळ सुरु आहे. एक दाढीवाला उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीसाठी सुभाष देसाई, अनिल देसाई , अनिल परब दिल्लीला रवाना होणार आहे. उद्या सकाळी 11 ची कोर्टाची वेळ आहे. महाराष्ट्र 1960 साली स्वतंत्र झाला 2022 साली राष्ट्रगीत सुरु झाल्यावर शर्ट खेचत राहतो. आपण अलीबाबची गोष्ट ऐकली. काय त्या सॉंग, काय ते आठवेळा आपटलो पण उध्दवजींच्या मुळे आमदार झालो. कोकणी भाषेतून शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका केली. मी फडणवीसांचे अभिनंदन करतो. अत्यंत अभ्यासू माणूस आहे. कारण ते आता बाळासाहेबांच्या नावावर मत मागत आहेत.