83 वर्षीय शरद पवार अजूनही सक्रीय…63 वर्षांच्या राजकारणातील 5 महत्वाच्या घटना

| Updated on: Dec 12, 2023 | 10:03 AM

Sharad Pawar Birthday | शरद पवार 83 वर्षांचे झाले आहे. परंतु त्यांचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत तरुणांना लाजवणारी आहे. त्यांचे वय वाढले असले तरी मन तरुण आहे. आजही पायाला भिंगरी लावल्यासारखे ते राज्यात दौरे करत आहेत. सोमवारी नाशिकमध्ये उतरुन त्यांना रास्ता रोको आंदोलन केले.

1 / 5
शरद पवार यांनी 1 मे 1960 रोजी राजकारणात प्रवेश केले. मग मागील सहा दशकांपासून महाराष्ट्राने शरद पवार नावाचा झंझावत पाहिला. महाराष्ट्रातील राजकारणात  नव्हे तर देशातील राजकारणातही शरद पवार 'फॅक्टर' महत्वाचा राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना आपले गुरु मानतात.

2 / 5
शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सोबत राजकारणात पाय रोवले. ते राज्यात मंत्रीही झाले. 18 जुलै 1978 रोजी शरद पवार यांनी महाराष्ट्राचे सर्वात युवा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, काँग्रेस (एस) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी बनवून पवार मुख्यमंत्री झाले.

3 / 5
शरद पवार दोन वेळा पंतप्रधान पदाच्या जवळ पोहचले होते. 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी राजकारणात येण्यास तयार नव्हत्या. त्यावेळी शरद पवार आणि पी. व्ही नरसिम्हा राव यांच्यात रस्सीखेच झाली. राव यांनी शरद पवार यांच्यापेक्षा जास्त मते घेतली.

4 / 5
1996 मध्ये शरद पवार यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची संधी आली होती. काँग्रेसकडे 145 जागा होत्या.  एचडी देवगौडा, लालू प्रसाद यादव व मुलायम सिंह यादव तसेच डाव्या पक्षांनी पवार पंतप्रधान होत असतील तर पाठिंबा देण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी पी.व्ही. नरसिम्हा राव यांनी देवेगौडा यांना बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

5 / 5
2019 साताऱ्यात शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली होती. ही सभा भर पावसात झाली. या सभेमुळे राज्यातील वातावरण बदलले. आजही शरद पवार यांच्या त्या सभेची चर्चा होत असते. त्यानंतर आता पुन्हा 2023 मध्ये मुंबईत शरद पवार यांनी पावसात सभा घेतली.