Video : सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार?; राज ठाकरे यांचं ते एक वाक्य ज्याने राजकीय चर्चांना उधाण

| Updated on: Jul 03, 2023 | 1:33 PM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केलं आहे. अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Video : सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार?; राज ठाकरे यांचं ते एक वाक्य ज्याने राजकीय चर्चांना उधाण
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे. पहाटेच्या शपथविधीच्या प्रयोगानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रयोग केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गट या समीकरणामुळे महाराष्ट्राचं अख्खं राजकारण ढवळून निघालं आहे. या तीन पक्षाच्या महायुतीचं जसं काही लोक स्वागत करत आहेत. तसेच काही लोक या खिचडी सरकारवर टीका करत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या खिचडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मतदारांनाच अशा प्रकारांना आळा घालण्याचं आवाहन केलं आहे.

राज ठाकरे हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दिवसे न् दिवस हे किळसवाणं होत चाललं आहे. या लोकांना मतदारांशी काही देणंघेणं नाही. कोण कोणत्या पक्षाचे हाडकोअर मतदार असतील, ते का त्यांचे मतदार होते याचा सर्वांना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाट्टेल ते कॉम्प्रमाईज करायचं हे सध्या महाराष्ट्रात पेव फुटलं आहे. लोकांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

लवकरच महाराष्ट्राचा दौरा

मी पुढच्यावेळी मी मेळावा घेणार आहे. तुम्हाला त्यावेळी बोलवेल. मला महाराष्ट्राशी बोलायचं आहे. त्यावेळी मी सर्व गोष्टींवर भाष्य करणार आहे. लवकरच माझा महाराष्ट्राचा दौराही सुरू होणार आहे. त्यावेळी मी जागोजागी जाईल. लोकांना भेटेल, असं राज ठाकरे म्हणाले.

पवारांचेच आशीर्वाद

अजित पवार यांच्या बंडाशी माझा काही संबंध नाही, असं शरद पवार म्हणत आहेत. शरद पवार काहीही म्हणत असले तरी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे असेच जाणार नाहीत हे लक्षात घ्या. ते पाठवल्याशिवाय जाऊच शकत नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यातरी मला आश्चर्य वाटणार नाही. कशाला काही सोयरसुतक राहिलं नाही. हा सर्व ड्रामा आहे. पहाटेच्या शपथविधीने सुरुवात झाली. नंतर राष्ट्रवादी-शिवसेना झाली. आता शत्रू कोण आणि मित्र कोण महाराष्ट्रात राहिलंच नाही, असंही ते म्हणाले.

मनसे स्वबळावर लढणार?

दरम्यान, मनसे लोकसभा निवडणुकीच्या कामलाा लागली आहे. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचं मनसेत घटत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे घडतंय त्याबद्दल लोकांच्या मनात चीड असल्याचे राज ठाकरे यांचं मत आहे. आता पक्षाला न भूतो न भविष्यती अशी संधी आहे. मतदार मनसेला भरभरून मतदान करतील असा राज ठाकरेंचा अंदाज आहे. त्यामुळे राज ठाकरे लवकरच पक्षाचा मेळावा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणातील घडोमोडींवर सविस्तर भूमिका मांडणार आहेत.

पुन्हा बैठक होणार

लोकसभा निवडणुकीत कोणत्या जागा आणि किती जागा लढवायच्या याबाबतची व्यूहरचना आखण्यासाठी पुढील आठवड्यात पक्षाच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. मनसेने उद्धव ठाकरेंबरोबर जावं असं लोकांमध्ये मत असल्याचे मतप्रवाह बैठकीत व्यक्त झाला.