नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आणि शरद पवार (Sharad Pawar Pm Modi Meet) यांच्या भेटीत काय चर्चा झाली? हा प्रश्न भेट झाल्यापासून काही तासांपासून संपर्ण देशाला पडला होता. महाष्ट्रातही यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. राज्यातल्या ईडीच्या कारवाईबाबतही (Ed Raid on Sanjay Raut) ही भेट असू शकते असे भाजप नेते सांगत होते. तर ही भेट 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत (12 MLA List) असू शकते, असे अजित पवारांपासून सर्व महाविकास आघाडीचे नेते सांगत होते. मात्र या भेटीत काय झालं याचा सस्पेन्स सध्या संपला आहे. या भेटीत तीन मुद्द्यावर चर्चा झाली आहे. यात राज्यातली ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाली. संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली त्याबाबत मोदींशी चर्चा केली असल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे. मागच्या दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्रत बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे. त्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. राज्यपालांकडून अडवणूक होत, असल्याचे पवारांनी मोदींना सांगितले.
संजय राऊतांवर कारवाईची गरज काय होती? असा सवाल कर पवारांनी मोदींकडे राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईची तक्रार केली आहे. संजय राऊत यांना ईडी कारवाई, ते राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकार आहेत, याबाबत मी मोदींना कल्पना दिली आहे. या 2 विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, असे पवार म्हणाले, तसेच केंद्रीय तपास यंत्रणा जबाबदार आहे. राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मोदींना दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे, त्यावरही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे दोन विषय मोदींच्या कानावर घातले. या 2 विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती यावेळी पवारांनी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी-सेना भाजपविरोधात एकत्र उभी आहे. इतरांच्या सांगण्यावरुन भाजपसोबत राष्ट्रवादी मुळीच जाणार नाही. मविआ सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करणार. मविआ सरकारला कोणताही धोका नाही, पुन्हा सत्तेत येऊ, असे म्हणत पवारांनी राज्यातल्या भाजप नेत्यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तसेच मंत्रिमंडळात कोणतेही बदल नाहीत, असेही त्यांनी ठणकावले आहे.
BMC Elections : मुंबई महापालिकेतील घराणेशाही संपवा, फडणवीसांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन