पवार गट-मनसेमध्ये लाखाची पैज, विडा उचलला, महाराष्ट्राच्या ‘या’ मतदारसंघात कोण जिंकणार?

| Updated on: May 16, 2024 | 1:45 PM

पुढच्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा आहे. महाराष्ट्रात हे शेवटच्या टप्प्याच मतदान आहे. त्याआधी पार पडलेल्या चार टप्प्यात वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झालय. आता महाराष्ट्रातील एका मतदारसंघावरुन मनसे आणि ठाकरे गटात 1 लाखाची पैज लागलीय.

पवार गट-मनसेमध्ये लाखाची पैज, विडा उचलला, महाराष्ट्राच्या या मतदारसंघात कोण जिंकणार?
sharad pawar party & mns Place 1 lakh bet over loksabha election win 2024
Follow us on

देशात लोकसभा निवडणुकीचे आतापर्यंत चार टप्पे झालेले आहेत. लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होणार आहे. महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्याच मतदान 20 मे रोजी होणार आहे. पाचवा टप्पा हा महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असणार आहे. पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाण्यात मतदान आहे. याआधी चार टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात मतदान झालय. पश्चिम महाराष्ट्रात मतदानानंतर काही ठिकाणी महाविकास आघाडीकडून आधीच विजयाचे दावे करण्यात येत आहेत. उमेदवारांच्या अभिनंदनाचे तसे पोस्टर्सही झळकले आहेत. आता महाराष्ट्रातील एका चर्चित मतदार संघावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार गटामध्ये पैज लागली आहे.

महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा कांटे की टक्कर पहायला मिळतेय. सोलापूरमध्ये महायुतीकडून राम सातपुते आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे रिंगणात आहेत. सोलापूर हा एकवेळ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण आता तशी स्थिती नाहीय. 2014 आणि 2019 मध्ये सोलापूरची जागा भाजपाने जिंकली होती. आता राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे असा सामना आहे. प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.

मनसे-पवार गटात लाखाची पैज

सोलापूरमध्ये यंदा कोण बाजी मारणार? यावरुन शरद पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये पैज लागली आहे. पवार गट महाविकास आघाडी तर मनसे महायुतीचा भाग आहे. महायुतीकडून राम सातपुते 70 ते 80 हजाराच्या मताधिक्क्याने निवडून येणार असा मनसेने दावा केलाय. 4 जूनला जय श्रीराम म्हणत हलगी वाजवत सोलापूरचा आवाज लोकसभेत जाणार असा मनसे नेत्याने दावा केलाय. महाविकास आघाडीला त्यांच्या अजेंड्यावर विश्वास असेल तर आमचा नरेंद्र मोदी, राज ठाकरेंवर विश्वास आहे असं मनसे नेत्याने सांगितलं.

पवार गटाच्या नेत्याने हे चॅलेंज स्वीकारलय. जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास आहे आणि यावेळी उमेदवार चांगला आहे, त्यामुळे 1 लाख 1 हजाराची पैज जिंकणार असं म्हणत पवार गटाच्या नेत्याने विडा उचलला.