Sharad Pawar | साहेब आशीर्वाद द्या, शरद पवारांच्या सभेआधी अजित पवार गटाच्या बॅनरने वेधलं लक्ष

| Updated on: Aug 17, 2023 | 2:55 PM

Sharad pawar - Ajir Pawar : शरद पवार यांच्या सभेसाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून ही पवारांचं स्वागत करणारे बॅनर लागले आहेत.

Sharad Pawar | साहेब आशीर्वाद द्या, शरद पवारांच्या सभेआधी अजित पवार गटाच्या बॅनरने वेधलं लक्ष
Follow us on

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचा या ठिकाणी मेळावा होणार आहे. या दरम्यान बीडमध्ये अजित पवार गटाकडून देखील शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. पण या बॅनरने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. अजित पवारांना “आशीर्वाद” देण्याची विनंती करणारे बॅनर अजित पवार गटाने लावले आहेत. आज शरद पवारांची सभा होणार आहे. या निमित्ताने शहरात मोठे बॅनर लागले आहेत.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी ही भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका घेत आहेत. पण त्याआधी 12 ऑगस्ट रोजी पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याने राजकारणात पुन्हा भूकंप होणार का अशी शक्यता वर्तवली जात होती. पण शरद पवार यांनी आपण भाजपसोबत कधीच जाणार नाही असं म्हटलं आहे.

महाविकासआघाडी एकजुट – पवार

शरद पवार यांनी सोमवारी अजित पवार यांच्यासोबतच्या भेटीवरून महाविकासआघाडीत कोणताही गोंधळ नसल्याची कल्पना फेटाळून लावली आहे. महाविकासआघाडी एकजूट आहे आणि मुंबईत होणारी विरोधी गटाची पुढील बैठक यशस्वीपणे आयोजित करू असं ही शरद पवार म्हणाले आहेत.

धनंजय मुंडे यांचं टेन्शन वाढणार

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते धनंजय मुंडे यांच्या घरच्या मैदानावर आज बीडमध्ये शरद पवारांची सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परळी मध्ये बबन गित्ते यांना बळ दिले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बबन गित्ते यांचा जाहीर प्रवेश होणार आहे.बबन गित्ते यांनी परळीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत जवळपास एक हजार गाड्यांचा ताफा बीडच्या सभेकडे वळविला आहे.


दरम्यान आता मुंडे बहीण भावाच्या लढतीमध्ये गित्ते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून असणार आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात आता बबन गित्तेंच्या माध्यमातून नवा पर्याय उपलब्ध झालाय. त्यामुळेच आता धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढणार आहे.