“इंडिया आघाडीत आम्ही सर्व एकत्र बसलो तेव्हा आमच्याकडे जेव्हा निवडणुका होत्या. त्यात एकत्र येण्याचा विचार होता. राज्यातील आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत एकत्रित काम करावं अशी चर्चा कधीही झाली नाही. पण आता ज्या पद्धतीने वृत्तपत्राने नोंद घेतली. त्यानंतर कमीत कमी राष्ट्रीय पातळीवरच्या इश्यूवर एकत्र येण्यासाठी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल. सर्वांना मिळून करू” असं शरद पवार म्हणाले. इंडिया आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे, अशा चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई ते नागपूर पर्यंतच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याच जाहीर केल्यापासून या चर्चा जोरात सुरु आहेत.
आज शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या एकत्र राहण्याबद्दल भाष्य केलं. “राज्यात इंडिया आघाडीचा संबंध नाही. पण राज्याचं शिबीर आठ-दहा दिवसात काँग्रेस, शिवसेना आणि आमचे नेते सहकारी एकत्र बसून निर्णय घेऊ” असं शरद पवार म्हणाले. “इंडिया आघाडीत लोकल निवडणुका एकत्र लढण्याची चर्चा झालीच नव्हती. राष्ट्रीय पातळीवरच्या चर्चा या आघाडीत होत होत्या. महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. पण आमची भावना आहे की एकत्र येऊन निवडणुका लढल्या पाहिजे” असं शरद पवार म्हणाले. म्हणजे उद्धव ठाकरेंनी आधीच स्वबळाचा नारा दिला असला, तरी शरद पवारांची भावना आहे की, एकत्र निवडणुका लढल्या पाहिजेत.
‘संवाद संपला नाही’
“इंडिया आणि महाविकास आघाडीतील संवाद संपला नाही. संवाद आहे, आम्ही आठ-दहा दिवसात बैठक बोलावत आहोत. उद्धव ठकारे यांनी स्वबळाचा खुलासा केला आहे. त्यांनी स्वच्छ सांगितलं की, आता बारामती आणि इंदापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तिथे आम्ही आघाडीचा विचार केला नाही. करणार नाही” असं शरद पवार म्हणाले. “दिल्लीत केजरीवालचा बेस आहे. पण त्यांना आम्हाला विश्वासात घेऊन काही करता आलं असतं. पण झालं नाही. सोडून द्या” असं शरद पवार म्हणाले.