Sharad Pawar : जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवार यांचं मोठं विधान

| Updated on: Oct 17, 2024 | 9:18 AM

Sharad Pawar : महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा कुठपर्यंत पोहोचलीय? किती जागांवर एकमत झालय? त्या बद्दल शरद पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, त्याबद्दलही शरद पवार बोलले आहेत.

Sharad Pawar : जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवार यांचं मोठं विधान
Sharad pawar
Follow us on

“महाविकास आघाडीत 288 पैकी 200 जागांवर एकमत झालय. उर्वरित जागांसाठी आज बैठक होईल. बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहतील. निर्णय घेतील, आम्हाला सांगतिलं” असं शरद पवार यांनी सांगितलं. ते कराड येथे बोलत होते. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना न्याय देवतेच्या मुर्तीमध्ये बदल झालाय त्या बद्दल प्रश्न विचारला. न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवून तलवार ऐवजी संविधान हाती देण्यात आलय. त्यावर शरद पवार म्हणाले की, “त्यांनी नवीन दिशा दिली आहे. हा विचार या देशात झाला नव्हता तो त्यांनी केला” मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल बोलत आहेत. लोकसभेला त्यांचा मोठा फटका बसला. यावर शरद पवार म्हणाले की, ‘निर्णय तर होऊ द्या, निर्णय झाल्यावर मग बोलता येईल’

माढ्याचे आमदार बबनदादा भेटणार आहेत, दोनवेळा भेट झाली याबद्दल पत्रकारांनी विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, ‘भेटायला कोणी आलं, तर काय करणार. राजकारणामुळे व्यक्तीगत सलोखा संपत नाही’ शरद पवार यांनी यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल मोठं विधान केलं. विधानसभेसाठी जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील. “जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष आहेत”
कालच शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल असं म्हटलं होतं. “विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण योग्य राहील” असं शरद पवार म्हणाले.

हरियाणाच्या निकालावर शरद पवार काय म्हणाले?

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाबाबत काही नेते दावा करत आहेत. मविआत शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचा आग्रह आहे, त्यावर शरद पवार बोलले की, “आमच्या तिघांची पत्रकार परिषद झाल्यानंतर हा विषय संपला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण योग्य राहील” हरियाणातील पराभवानंतर इंडिया आघाडीच्या नितीमध्ये काही बदल होणार का? “हरियाणात त्यांचं सरकार आहे, ते कायम झालं. यापेक्षा दुसरं काही नाही. हरियाणाच्या निकालाचा आम्ही अभ्यास करतोय. जम्मू-काश्मीर सारख्या निवडणुकीवर जगाच लक्ष असतं. त्या पार्श्वभूमीवर तो निकाल देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे”