रावसाहेब दानवे ज्योतिष शास्त्राचे जाणकार?, उद्याचं चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण माहीत नव्हता; शरद पवारांचा टोला

| Updated on: Nov 24, 2020 | 4:19 PM

दोन महिन्यात राज्यात आपलं सरकार येईल, या भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. (ncp leader sharad pawar taunt raosaheb danve)

रावसाहेब दानवे ज्योतिष शास्त्राचे जाणकार?, उद्याचं चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण माहीत नव्हता; शरद पवारांचा टोला
Follow us on

मुंबई: दोन महिन्यात राज्यात आपलं सरकार येईल, या भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. दानवे ज्योतिष शास्त्राचे जाणकार असल्याचा आणि उद्याचे चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण मला माहीत नव्हता, असा टोला शरद पवार यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. (ncp leader sharad pawar taunt raosaheb danve)

माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी बोलताना शरद पवार यांनी ही टीका केली. रावसाहेब दानवे यांनी अनेक वर्षे विधीमंडळात काम केलं. उद्याचं चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण मला माहीत नव्हता. ते ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे सुद्धा माहीत नव्हते, असं शरद पवार म्हणाले. दानवे यांनी काल दोन महिन्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरून पवारांनी त्यांना टोला लगावला. यावेळी पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. सत्ता गेल्यामुळे त्रास होत असल्याने फडणीस सारखं बोलत असतात. त्यामुळेच त्यांनी मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल असं वारंवार बोलावं लागतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागण्याची चर्चा आहे. त्यावर मात्र पवारांनी बोलण्यास नकार दिला. लॉकडाऊन हा सरकारचा विषय आहे. त्यावर सरकारच भूमिका घेईल. त्यावर मी बोलणार नाही, असं पवार म्हणाले. तसेच कोरोनाची लस रास्त किंमतीत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाची लस बनवणाऱ्या संस्थेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेऊन गेलो होतो. आता मोदी पुन्हा तिकडे जाणार आहेत ही चांगली गोष्ट आहे, असं ते म्हणाले. तसेच कोरोनावर कोणीही राजकारण करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

 

संबंधित बातम्या:

तीन दिवसांसाठी का होईना अजितदादांनी काकांना सोडले होते, हा इतिहास नाही का?; चंद्रकांतदादांचा टोला

आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या, संजय राऊतांचं थेट चॅलेंज

2 महिन्यात राज्यात पुन्हा भाजप सरकार, रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

(ncp leader sharad pawar taunt raosaheb danve)