औरंगाबाद – औरंगाबादच्या संभाजीनगर (Sambhajinagar) नामांतराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अंतर राखले आहे. हा नामांतराचा मुद्दा महाविकास आघाडीच्या (MVA)किमान समान कार्यक्रमात हा मुद्दा नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय पूर्णपणे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होता असेही त्यांनी सांगितले. बैठकीत मते व्यक्त करण्यात आली, मात्र मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिक्कामोर्तबब मुख्यमंत्री करतात. मुख्यमंत्र्यांचे निर्णय हाच मंत्रिमंडळाचे निर्णय म्हणून जाहीर करण्यात येतो. या निर्णयाची माहिती नंतर मिळाल्याचं सांगत, हा पूर्णपणे शिवसेनेचा होता असे सांगत या निर्णयापासून अंतर राखण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला औरंगाबादे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केलेला आहे.
देशात कर्नाटक, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र आणि गोव्यात विरोधकांना फोडण्याचे काम सुरु आहे. यानिमित्ताने देशात वेगळ्या दिशेने लोकशाही संस्था संपवण्याचे काम सुरु असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. एक चुकीचा पायंडा राज्यात आणि देशात निर्माण होत असल्याची टीका त्यांनी यानिमित्ताने केली आहे. शिवसेनेचे बंड मोडून काढता आले नाही, याचे कारण सांगताना त्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंध होते, त्यांना या मार्गाने जायचे नाही असे सांगितल्यावर त्यांनी ऐकल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असे म्हणालो नव्हतो. तयारीला लागा असे कार्यकर्त्यांना सांगितले होते. उद्याच्या होणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी सांगताना असे सांगितले होते की अजून अडीच वर्ष आहेत, निवडणुकांसाठी. मात्र सहा महिने वातावरण वेगळे असते त्यामुळे दोन वर्षांचा आपल्या हातात आहेत, त्यामुळे कामाला लागा असे कार्यकर्त्यांना सांगितले होते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा विचार आपण करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ही निवडणूक एकत्र लढावी अशी आपली वस्तूस्थिती आहे. मात्र याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी, काँग्रेस आणि शिवसेनेशी बोललेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.