Ajit Pawar : अजित पवार पहिल्यांदाच पहाटेच्या शपथविधीवरुन बोलले आहेत. एका उद्योगपतीच्या घरी अमित शाहांसोबत शरद पवारांची बैठक झाली. भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याचं ठरलं आणि शरद पवार पलटले असा थेट आरोप अजित पवारांनी केला आहे. 2019 मधल्या पहाटेच्या शपथविधीवरुन, अजित पवारांनी पहिल्यांच शरद पवारांचं नाव घेतलं. एका उद्योगपतीच्या घरी, अमित शाहांसोबत शरद पवारांच्या 5-6 बैठका झाल्या. त्या बैठकीत मी, फडणवीस आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होतो. भाजपसोबत सत्ता स्थापन करायची हे ठरलं आणि मुंबईत आल्यावर शरद पवार फिरवल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. त्यानंतर अमित शाहांनी फोन करुन शब्द पाळावं लागेल, असं सांगितल्यानं आपण फडणवीसांसोबत शपथ घेतल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
शरद पवार यांनी अजित पवारांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मला माहिती नाही असं सांगून आमची भाजपसोबत जाण्यासाठी संमती नव्हती असं शरद पवार म्हणाले आहेत. आता जे अजित पवार बारामतीच्या सभेत शुक्रवारी बोललेत. तेच स्वत: फडणवीस TV9च्या कॉनक्लेव्हमध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारीत बोलले होते.
अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन भाजप आणि शिवसेना युतीत फूट पडली. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरु केली होती. त्याच काळात अमित शाहांसोबतच शरद पवारांच्या बैठका झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं. म्हणजेच भाजपला शरद पवारांनी दिलेला शब्द फिरवला. मात्र आपण शब्द पाळण्यासाठी फडणवीसांसोबत शपथ घेतल्याचं अजित पवार सांगत आहेत.
पहाटेच्या शपथविधीवरुन आतापर्यंत गूढच आहे. ते गूढ उकलण्याचं काम फडणवीसांनी TV9च्या कॉनक्लेव्हपासून सुरु केलं. आता थेट अजित पवारांनी शरद पवारांचं नाव घेतलं. पहाटेच्या शपथविधीच्या घटनेला, आता साडे 4 वर्ष होत आलीत. 6 महिन्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका येतील. पण आतापर्यंत पहाटेच्या शपथविधीआधी पडद्याआड काय काय घडलं हे समोर येणं सुरुच आहे.