रत्नागिरी: शेती हा काही शिवसेनेचा विषय नाही. सेनेला तेवढी अक्कलही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना विरोध करण्यासाठीच शिवसेनेने या विषयाची काही जाण नसूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला, असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केले. (BJP leader Nilesh Rane take a dig at Shivsena)
मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी मंगळवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेच्या भूमिकेचा समाचार घेतला. राज्यात ‘भारत बंद’ आंदोलनाचा प्रभाव कुठेही दिसत नाही. शेती हा शिवसेनेचा विषय कधीही असू शकत नाही. शिवसेना केवळ विरोधाला विरोध करत आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले.
कृषी कायद्यात बदल करावा, अशी मागणी 2010 साली शरद पवार यांनीच केली होती. त्यामुळे आता या कायद्यांना त्यांच्याकडून होणारा विरोध अनाकलनीय आहे. केवळ नरेंद्र मोदींनी हा कायदा आणला म्हणून त्याला विरोध केला जात आहे. फक्त पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधातील तीव्रता जास्त आहे. इतर कुठल्याही राज्यांमध्ये तशी परिस्थिती नसल्याचा दावा निलेश राणे यांनी केला.
शिवसेना हा कन्फ्युज पक्ष आहे. शिवसेनेचा उतरता काळ सुरु झाला असून त्यांची पत घसरत आहे. दिल्लीतही शिवसेनेला इज्जत उरलेली नाही. अलीकडच्या काळात शिवसेना कुठल्याही एका भूमिकेवर ठाम राहिल्याचे दिसत नाही. ते रोज नवीन खोटं बोलतात. एक दिवस महाराष्ट्राची जनता त्यांची दखल घेणे बंद करेल. त्यामुळे राज्यात लवकरच शिवसेना हा पक्षच अदखलपात्र ठरेल.
शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचे केंद्र सरकारचे मनसुबे असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. गेल्या 11-12 दिवसांत तसे फारसे प्रयत्नच सरकारकडून झालेले दिसत नाहीत. उलट आंदोलन लांबवायचे आणि शेतकऱ्यांचा निर्धार डळमळीत होण्याची वाट पाहायची, तशी संधी मिळताच आंदोलन निष्प्रभ करायचे, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
संबंधित बातम्या:
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत, दिल्लीतील आजची स्थिती काय?
(BJP leader Nilesh Rane take a dig at Shivsena)