मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत किती आमदार आहेत यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काहींच्या मते शिंदेंसोबत 13 आमदार आहेत. तर काहींच्या मते शिंदेंकडे 22 आमदार आहेत. मात्र, शिंदे यांनी आपल्यासोबत 46 आमदार असल्याचं मीडियासमोर सांगितलं आहे. प्रत्यक्षात मात्र शिंदे यांच्या गळाला 34 आमदार लागल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचेच नव्हे तर अपक्ष आमदारांनीही शिंदे यांना साथ दिली आहे. खुद्द एकनाथ शिंदे यांनीच आमदारांची ही नावे जाहीर केली आहे. आमदारांच्या नावाचं एक पत्रच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवलं आहे. त्यामुळे शिंदेंकडे असलेल्या आमदारांचा आकडा उघड झाला आहे. त्यामुळे शिवसेनेत (shivsena) उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. तसेच आघाडी सरकार (maha vikas aghadi) अल्पमतात गेल्याचंही स्पष्ट झालं आहे.
आमदाराचे नाव | मतदारसंघ |
---|---|
शंभूराज देसाई | पाटण |
संजय शिरसाठ | औरंगाबाद |
नितीन देशमुख बाळापूर | अकोला |
किशोर पाटील | पाचोरा |
प्रकाश सुर्वे | मागाठाणे |
राजकुमार पटेल | मेळघाट |
लता सोनावणे | चोपडा |
यामिनी जाधव | भायखळा |
सुहास कांदे | नांदगाव |
विश्वानाथ भोईर | कल्याण पश्चिम |
अनिल बाबर | खानापूर |
चिमणराव पाटील | एरंडोल |
शहाजी पाटील | सांगोला |
शांताराम मोरे | भिवंडी |
श्रीनिवास वनगा | पालघर |
डॉ. बालाजी किणीकर | अंबरनाथ |
रमेश बोरनारे | औरंगाबाद |
प्रदीप जैस्वाल | औरंगाबाद मध्य |
संजय रायमुलकर | महेकर |
महेंद्र दळवी | अलिबाग |
महेंद्र थोरवे | कर्जत |
भरत गोगावले | महाड |
संदीपान भुमरे | पैठण |
तानाजी सावंत | परांडा, उस्मानाबाद |
बालाजी कल्याणकर | नांदेड |
अब्दुल सत्तार | सिल्लोड |
प्रताप सरनाईक | ओवळा माजिवडा |
ज्ञानराज चौगुले | उमरगा |
संजय गायकवाड | बुलडाणा |
महेश शिंदे | कोरेगाव |
नरेंद्र बनकर | भंडारा |
एकनाथ शिंदे | कोपरी |
बच्चू कडू | अचलपूर |
राजेंद्र पाटील | शिर्डी |
एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत राजकीय संकट निर्माण झालं आहे. ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. तसेच व्हीप काढून सर्व आमदारांना मिटिंगलाही बोलावलं. पण त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी संख्याबळाच्या आधारे आपणच गटनेते असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांनी सुनील प्रभू यांची मुख्यप्रतोद पदावरून हकालपट्टी केली. तसेच भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली.