मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोल सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे वारांवार कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आव्हान करत आहेत. मात्र एसटी कर्मचारी विलिनिकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते हे एसटी कामगारांची बाजू न्यायालयात मांडत आहेत. तसेच ते सध्या या आंदोलनाचे नेतृत्व करताना देखील दिसून येत आहेत. यावरून शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे. सदावर्ते हे आंदोलनाच्या नावावर वर्गणी गोळा करत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टिका केली आहे. सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावत आहेत. त्यांनी आंदोलनाच्या नाववार वर्गणी गोळा केली आहे, त्या वर्गणीचा हिशोब त्यांनी आधी द्यावा, असे कायंदे यांनी म्हटले आहे. सदावर्ते यांनी मर्यादेत राहावे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान आपल्यावरील टीकेला आता सदावर्ते काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. संपामुळे एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा काम सुरू कारावे, असे आवाहन परिवहन मंत्र्यांकडून करण्यात येत आहे. मात्र एसटी कर्मचारी विलिनिकरणावर ठाम असून, जोपर्यंत विलिनिकरण होणार नाही, तोपर्यंत काम सुरू करणार नसल्याची भूमीका त्यांनी घेतली आहे. आतापर्यंत अनेक आंदोलक कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
PM Security Breach: 500 शेतकरी मरण पावले, त्यासाठी कुणाला फासावर लटकवायचे?; राऊतांचा सवाल
मला नेहमीच मी न केलेल्याची शिक्षा मिळते, पंकजांचे चिमटे, रोख कुणाकडे?