‘मी शपथ घेऊन सांगतो, खोटं बोलत नाही’, वकिलांच्या प्रश्नांवर वैतागलेले सुनील प्रभू काय म्हणाले?

| Updated on: Nov 23, 2023 | 8:05 PM

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवली. यावेळी सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी वकिलांनी सुनील प्रभू यांचा एक दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुनील प्रभू यांनी "मी संविधानाची शपथ घेऊन सांगतो, मी खोटं बोलत नाही", असं म्हटलं.

मी शपथ घेऊन सांगतो, खोटं बोलत नाही, वकिलांच्या प्रश्नांवर वैतागलेले सुनील प्रभू काय म्हणाले?
Follow us on

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 23 नोव्हेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर महत्त्वाची सुनावणी पार पडली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आजसुद्धा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवली. यावेळी वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारले. सुनील प्रभू यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुनील प्रभू यांच्या काही उत्तरांवर महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. महेश जेठमलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या आमदारांच्या पार पडलेल्या बैठकीबाबतही प्रश्न विचारले. या बैठकीत जे आमदार उपस्थित होते, त्यांची स्वाक्षरी खोटी आहे, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला. यावेळी सुनील प्रभू यांनी “मी संविधानाची शपथ घेऊन सांगतो. मी खोटं बोलत नाही”, असं म्हटलं.

सवाल-जवाबात नेमकं संभाषण काय झालं?

आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज दुपारच्या सत्रात पुन्हा सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली. यावेळी सुनावणी एकूण 18 दिवस असेल, असं स्पष्ट करण्यात आलं. विधानसभा अध्यक्षांनी तारखा जाहीर केल्या. नोव्हेंबरच्या २८, २९, ३० या तारखांना सलग सुनावणी होईल. तर डिसेंबरच्या १,२ ५,६,७, १,१२,१३,१४,१५, १८, १९, २०, २१, २२ या तारखांना सुनावणी होईल, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं.

जेठमलानी – हा वेळ कमी आहे. अतिरिक्त वेळ मिळाला पाहिजे.

अध्यक्ष – माझ्याकडे आता अजून पर्याय नाही. एवढाच वेळ देऊ शकतो. हिवाळी अधिवेशनाच्यावेळी सुद्धा सुनावणी होणार

नार्वेकर – २१ जून २०२२ त्यावेळी विधानसभा अध्यक्ष नव्हते.

प्रभू – त्यावेळी उपाध्यक्ष हे अध्यक्षांचे प्रभारी काम पाहत होते. त्यावेळी अध्यक्षांचा प्रभार हा उपाध्यक्षांकडे होता. म्हणून मी अध्यक्ष असा उल्लेख केला

जेठमलानी – आपण सह पत्र पी ३ मध्ये जो ठराव केलेला आहे, तो कुणी तयार केला आहे?

प्रभू – आमदारांची बैठक वर्षा बंगल्यावर बोलावली होती. त्या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्या आमदारांच्या हजेरीच्या सहीचे रजिस्टर आपल्याकडे (अध्यक्षांकडे) सादर केले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या आमदारांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

जेठमलानी – माझा थेट प्रश्न असा आहे की हा ठराव कोणी तयार केला? 21 जूनला कोणत्या व्यक्तीने हा ठराव तयार केला?

प्रभू – हा ठराव तयार करणे एक प्रक्रियेचा कामकाजाचा भाग आहे. ज्यांनी अनुमोदन दिलं त्यांच्या सह्या त्यावर आहे.

जेठमलानी – नेमका हा ठराव कोणी अशी कोण व्यक्ती आहेत का?

प्रभू – रवींद्र वायकर यांनी ठराव मांडला होता

जेठमलानी – डॉक्युमेंटमध्ये उदय सामंत दादा भुसे, संजय राठोड यांनी अनुमोदन दिला असं तुम्ही म्हणताय पण कथित ठरावात त्यांनी अनुमोदन दिलेलं नाही

प्रभू – त्यांनी या ठरावावर माझ्यासमोर सह्या केल्या आहेत. हे सगळं मी सादर करतो

जेठमलानी – उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड यांच्या नावासमोर असलेल्या सह्या या त्यांच्या नाहीत. त्या खोट्या आहेत

प्रभू – हे खोटं आहे

जेठमलानी – जर तुम्ही म्हणता सह्या तुमच्यासमोर झाल्यात. पण ते म्हणतात आमच्या नाहीत. जर या सह्या बनावट असतील तर त्याला तुम्ही जबाबदार असतील

प्रभू – मी संविधानाची शपथ घेऊन सांगतो की मी खोटं बोलणार नाही, माझ्यासमोर या सह्या त्यांनी केल्यात, मी खोटं कशाला बोलू? मला गुन्हेगार बनवत आहेत.

प्रभू – मी खोटे कसे बोलेन? माझ्यावर फोर्जरी कशी लावू शकता? या कठड्यात आणून मला गुन्हेगार बनवत आहात?

जेठमलानी – २१ जून २०२२ रोजीच्या कथित बैठकीत असा कुठलाही ठराव पारित झाला नाही

प्रभू – २१ जूनच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि आमदारांच्या बैठकीत हा ठराव मंजूर झाला

जेठमलानी – २१ जून २०२१ रोजीच्या कथित बैठकीत उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड यांना सह्या करताना उद्धव ठाकरे यांनी पाहिले का?

प्रभू – मी प्रत्यक्ष पाहिले आहे. उद्धव ठाकरे हे त्या बैठकीचे अध्यक्ष होते. ठराव सूचकाने ठराव सुचवला. उद्धव ठाकरे यांच्या समोरच बैठक झाली. त्यांच्या समोरच सह्या झाल्या. उद्धव ठाकरे यांनी पाहिले.

जेठमलानी – या कथित बैठकीत ठराव पास करण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठीची बैठक कोणत्या वेळेपासून कोणत्या वेळेपर्यत चालली?

प्रभू – वर्षा बंगला दुपारी साडे 12 ते साडे 4 पर्यत बैठक चालली

जेठमलानी – 21 जूनला एकनाथ शिंदे यांचा मन वळविण्याचा प्रयत्न केला जात होता. उद्धव ठाकरे यांनी यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे मध्यस्थ पाठविले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पदावरून हटविण्याबाबत ठराव 21 जूनला होऊ शकला नाही ?

प्रभू- उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यात ठराव पास करण्यात आला

जेठमलानी – आपल्याला दाखवलेल्या याचिकेत प्रतिवादी क्रमांक 16 आणि 22 हे संजय राठोड आणि दादा भुसे आहेत का ?

प्रभू – हो आहेत

जेठमलानी – आपण अध्यक्षांसमोर प्रतिज्ञापत्रात म्हणतात की दादा भुसे आणि संजय राठोड हे बैठकीला हजर होते मात्र सर्वोच्च न्यायालयात तुम्ही प्रतिज्ञापत्र असे म्हटले आहात की हे दोघे गैरहजर होते हे आपले परस्पर विरोधी विधानांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे

प्रभू – हे रेकॉर्डवर आहे

जेठमलानी – आपल्याला दाखवलेल्या याचिकेत प्रतिवादी क्रमांक 16 आणि 22 हे संजय राठोड आणि दादा भुसे आहेत का ?

प्रभू – हो आहेत

जेठमलानी – आपण अध्यक्षांसमोर प्रतिज्ञापत्रात म्हणतात की दादा भुसे आणि संजय राठोड हे बैठकीला हजर होते मात्र सर्वोच्च न्यायालयात तुम्ही प्रतिज्ञापत्र असे म्हटले आहात की हे दोघे गैरहजर होते हे आपले परस्पर विरोधी विधानांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे

प्रभू – हे रेकॉर्डवर आहे

आजची सुनावणी संपली

पुढील सुनावणी मंगळवारी (28 नोव्हेंबर)