मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागच्या आठवड्यात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना पात्र ठरवले. त्याचवेळी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष अधिकृत शिवसेना ठरवलं. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाचा आधार घेतला. राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयावर अपेक्षेप्रमाणे ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिला, त्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याच ठाकरे गटाने म्हटलय. नुकतीच ठाकरे गटाने वरळीत महापत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप केले होते. त्याचदिवशी राहुल नार्वेकर यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता.
राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांच्या गटाला अधिकृत पक्ष ठरवताना 1999 सालची शिवसेनेची घटना ग्राह्य धरली. त्यांनी 2018 मध्ये शिवसेनेकडून जी निवडणूक आयोगाला कागदपत्र देण्यात आली, त्यात घटनादुरुस्तीचा उल्लेख नसल्याच म्हटलं. सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशानुसारच आपण निकाल दिलाय, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलय. शिवसेनेत पक्षप्रमुखापेक्षा राष्ट्रीय कार्यकारिणी सर्वोच्च असल्याच निरीक्षण त्यांनी नोंदवल. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असं म्हटल जात असतानाच आता राहुल नार्वेकर यांनी आपल मत व्यक्त केलं.
राहुल नार्वेकर त्यांनी दिलेल्या निकालावर काय म्हणाले?
“मी कायदा-संविधानाला धरुन निर्णय दिलाय. कोर्ट निर्णयात बदल करणार नाही” असा विश्वास व्यक्त केला. “याचिका दाखल झाली असेल, तर नोटीस जारी होणं स्वाभाविक आहे. कारण कोर्ट दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देणार नाही. मी निर्णय दिलाय तो कायद्यातील तरतुदी, संविधानातील तरतूद आणि शेड्युल 10 मधील तरतुदीनुसार दिलाय. योग्य निर्णय दिलाय, या ऑर्डरमध्ये कुठला बदल होईल असं वाटत नाही” असं राहुल नार्वेकर म्हणाले.