Sanjay Raut : उदय सामंत शिंदेंकडे गेले की पाठवले?; संजय राऊत म्हणतात…

| Updated on: Jun 27, 2022 | 12:07 PM

Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना उदय सामंत यांच्याबाबत प्रश्न विचारला गेला. सामंतांना तुम्ही पाठवलं की ते गेले असं राऊत यांना विचारण्यात आलं.

Sanjay Raut : उदय सामंत शिंदेंकडे गेले की पाठवले?; संजय राऊत म्हणतात...
उदय सामंत शिंदेंकडे गेले की पाठवले?; संजय राऊत म्हणतात...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडानंतर मी शिवसेनेतच राहील असं सांगणारे मंत्री उदय सामंत (uday samant) यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या बंडाच्या सहाव्या दिवशी उदय सामंत हे थेट गुवाहाटीला पोहोचले आणि शिंदेंना जाऊन मिळाले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील घडामोडी, पक्षातून येणारी विधाने आणि या लढाईत शिंदे गट यशस्वी होणार असल्याची खात्री पटल्यानंतर सामंत गुवाहाटीला गेले असल्याचं सांगितलं जात आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेनेच सामंत यांना पाठवल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना छेडले असता राऊत यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. पण सूचक असं विधानही करण्यास ते विसरले नाहीत. त्यामुळे सामंत गेले की पाठवले याबाबतचं रहस्य वाढलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना उदय सामंत यांच्याबाबत प्रश्न विचारला गेला. सामंतांना तुम्ही पाठवलं की ते गेले असं राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर राऊतांनी स्मित हास्य केलं. पाहू ना. भविष्यात ते कळेलच, असं सूचक विधान राऊत यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. सर्वच नेते आमच्या आणि पक्षप्रमुखांच्या जवळचे होते. उदय सामंत जवळचे होते. दिपक केसरकर जवळचे होते. एकनाथ शिंदे तर आमच्या सर्वात जवळचे आहेत. आजही ते आमच्या जवळचे आहेत, असं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

जिंदा कौम है, पाच साल इंतजार नही करती

गुलाबरावांचं भाषण ऐका. त्यांनीच बाप बदलण्याची भाषा केली आहे. त्यांनी भाषणातून मार्गदर्शन केलं आहे. त्यांची भाषा ऐका. माझ्या आधी त्यांनी ही भाषा वापरली आहे. मी त्यांच्या भाषणाची ही क्लिप ट्विट केली आहे. जे लोक 40-40 वर्ष पार्टीत राहतात आणि सोडून जातात. ते लोक म्हणजे जिवंत प्रेते आहेत. जिंदा कौम है, पाच साल इंतजार नही करती हे वाक्य राममनोहर लोहियांचं आहे. माझं नाही. मी कुणाच्या आत्म्याला, भावनेला ठेच नाही पोचोवली. मी फक्त म्हटलं तुमचा आत्मा मेला आहे. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आहे, असंही ते म्हणाले.

या महाराष्ट्रात, कोणी रोखलंय?

कायदेशीर लढाई आहे. लीगल अँड स्ट्रीट फाईट दोन्ही बाजूने होत राहील. तुमच्याकडे 50 आमदारांचं बहुमत आहे तर थांबले कशाला? असा सवाल कालच शरद पवार यांनीही विचारला आहे. गुवाहाटीत प्रलय आला आहे. 120 लोक मेले आहेत. तुम्ही का बसला तिथे? या महाराष्ट्रात तुम्हाला कोणी रोखलं आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

बंडखोरांचा खासदारांशी संपर्क

हे लोक खासदारांशी संपर्क करत आहेत. आमच्याशीही संपर्क केले जात आहेत. तुम्ही पक्षासाठी एवढे का करत आहात? तुम्हाला पक्षाने काय दिलं? असं ते मला विचारत आहेत. मी जो काही आहे तो पक्षामुळेच. पक्षानेच मला सर्व काही दिलं आहे, असं मी या लोकांना सुनावलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.