Loksabha Election 2024 | रमजानचा पवित्र महिना सुरु झालाय. प्रत्येक ठिकाणी मुस्लिम बांधवांमध्ये रमजानचा उत्साह दिसून येतोय. या दरम्यान महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने रमजानच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी सिंगल विंडो सिस्टिमची मागणी केलीय. लोकसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचा म्हटलं आहे. लवकरच सर्वत्र आदर्श अचारसंहिता लागू होईल. धार्मिक कार्यक्रमासाठी ‘सिंगल विंडो सिस्टम’ची मागणी करण्यात आली आहे.
अनिल परब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना यूबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील नेते मानले जातात. अनिल परब म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीसाठी अचारसंहिताल लवकरच लागू होईल. रमजानचा महिना सुरु आहे. मुस्लिम समाजाचे विविध कार्यक्रम होतील. सोबत शिवजयंती आणि आंबेडकर जयंती सुद्धा येणार आहे. अशावेळी लोकांना धार्मिक आणि महापुरुषांच्या स्मरणासाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात कुठल्याही अडचणी येऊ नयेत. म्हणून ‘सिंगल विंडो सिस्टम’ची व्यवस्था राज्य सरकारने करावी. अशी आमची मागणी आहे”
रमजानसाठी जी मागणी केलीय, त्यात चूक काय?
यूबीटी नेते अनिल परब म्हणाले की, ‘आम्ही निवडणूक आयोगाला या संबंधी पत्र लिहिणार आहोत’ “आमच हिंदुत्व वेगळ आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही रमजानसाठी जी मागणी केलीय, त्यात चूक काय आहे?. ह्द्यात राम आणि हाताला काम असलेल आमच हिंदुत्व आहे. त्यामुळे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकत नाही” असं अनिल परब म्हणाले.