अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा होती, मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रयत्न झाला नाही, असं वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. या अभद्र युतीचा कोणताही परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार नाही, असा दावा त्यांनी केला. शिवाय वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमशी आमचा कोणताही संबंध नसल्याचं महाजन यांनी म्हटलं. वाचा – आम्हाला मतदान का केलंस?, शिवसेना नगरसेवकांनी छिंदमला चोपलं
अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले आहेत. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्याक्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ भाजपच्या पदरात पडलं. वाचा – पक्षाच्या आदेशाला केराची टोपली, नगरमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांची भाजपला मतं
राष्ट्रवादीची भाजपला साथ
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी युती केल्यामुळे काँग्रेसच्या 5 नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार घातला. त्यामुळे भाजपचा मार्ग आणखी सुकर झाला. 68 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत 35 ही मॅजिक फिगर होती. तिसऱ्या नंबरवर राहूनही शिवाजी कर्डिले यांनी महापौर भाजपचाच होईल, असा दावा यापूर्वीच केला होता. तसंच त्यांनी आज करुन दाखवलं. वाचा – अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर
अहमदनगर महापालिका निवडणूक अंतिम निकाल 2018 :