हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, संजय राऊतांचं सूचक ट्विट

| Updated on: Jul 04, 2021 | 10:58 AM

राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापलथ होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते आशिष शेलार एकमेकांना भेटले. (Sanjay Raut)

हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, संजय राऊतांचं सूचक ट्विट
ashish shelar and sanjay raut
Follow us on

मुंबई: राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापलथ होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते आशिष शेलार एकमेकांना भेटले. ही गुप्त भेट होती. पण मीडियाच्या कॅमेऱ्यातून ती सुटली नाही. आता या भेटीवर शेलार आणि राऊत यांच्याकडून इन्कार केला जात आहे. पण संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. (shivsena leader Sanjay Raut comment on meeting with ashish shelar)

राऊत-शेलार यांच्या भेटीवर काल दिवसभर राज्यात चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज एक ट्विट केलं. ‘हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ हमारे नाम से आग लग जाती है।’, असं सूचक विधान राऊत यांनी या ट्विटमधून केलं आहे. राऊत यांच्या या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. या ट्विटद्वारे राऊत यांनी शेलार यांच्यासोबत झालेल्या भेटीचं वृत्त नाकारलं आहे. या अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच काही लोक आपल्या नावाने अफवा पसरवत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आग कुणाला लागली?

हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ हमारे नाम से आग लग जाती है।, असं राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आग कुणाला लागली? राऊतांविरोधात अफवा कोण पसरवत आहे? असा सवाल केला जात आहे. राऊतांना नक्की कुणाकडे बोट दाखवायचे आहे? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. राऊत-शेलार भेटीच्या अफवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी उडवू शकत नाही. कारण त्यातून त्यांना काहीच फायदा नाही. मात्र, राज्यात संभ्रमाचं वातावरण निर्माण व्हावं, शिवसेनेबद्दल दोन्ही काँग्रेसमध्ये संशय निर्माण व्हावा या हेतूने भाजपकडून अशा अफवा पसरविल्या जाऊ शकतात, त्यामुळे राऊत यांच्या ट्विटचा रोख हा भाजपच्या दिशेनेच असावा, असं राजकीय निरीक्षक सांगतात.

थेट बोलायचं नसेल तेव्हा शायरी

राऊत यांची एक खासियत आहे. त्यांना जे मांडायचं ते ते स्पष्टपणे मांडतात. भूमिका क्लिअर करून संशयाचं ढग दूर करतात. पण जेव्हा एखाद्या गोष्टीवर थेट भाष्य करायचं नसेल आणि काही गोष्टींबद्दलचं गूढ कायम ठेवायचं असेल तर ते ट्विट करतात. एका ट्विटमधून अनेक अर्थ निघतील अशा शायरीचा आधार घेत ते ट्विट करतात. त्यामुळे राऊत यांच्या ट्विटनंतर काही दिवस पतंगबाजी होते. मात्र, ट्विटनंतर पडद्याआड जे होतं ते कधीच बाहेर येत नाही. आताही त्यांनी ट्विट केलंय, शायरीचा आधार घेतलाय. त्यामुळे राऊत यांनी काही गोष्टी झाकण्यासाठी ट्विट केलंय, की काही गोष्टींचा इन्कार करण्यासाठी ट्विट केलंय आगामी राजकीय घडामोडीतूनच स्पष्ट होईल, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

राऊत आज काय म्हणाले?

ट्विट केल्यानंतर राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. फवा पसरवल्या जातात. ज्यांना माझ्यापासून वेदना होतात, यातना होतात असे लोक अफवा पसरवत असतात. महाराष्ट्रात दोन वेगळ्या पक्षाचे नेते भेटले तर आश्चर्य वाटण्याचं कारण काय?, असा सवाल करतानाच मी काल दिवसभर कामात होतो. कुणालाही भेटलो नाही. तरीही अफवा पसरवण्यात आल्या. अशा अफवा पसरवल्याने राजकारण हलत नाही, अस्थिरही होत नाही. महाराष्ट्र सरकारला अडचणीही होत नाही. पण अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील, असं राऊत म्हणाले.

‘त्यांनी’ अफवा पसरवल्या

मागे एकदा मी शेलारांना भेटलो होतो. त्यावेळी आम्ही उघडपणे कॉफी प्यायलो होतो, असं सांगतानाच जेवढ्या अफवा पसरवल्या जातील तेवढे आम्ही मजबूत होऊ. मजबूतीने एकत्र येऊन. माझ्या लिखानाने कुणाला त्रास झाला असेल आणि त्यातून या अफवा आल्या असतील तर त्याचं मी स्वागत करतो, असा टोलाही त्यांनी लगावला. (shivsena leader Sanjay Raut comment on meeting with ashish shelar)

 

संबंधित बातम्या:

कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील: राऊत

मोठी बातमी : संजय राऊत आणि आशिष शेलार यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय?

संजय राऊत-आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, नाना पटोले म्हणाले…

(shivsena leader Sanjay Raut comment on meeting with ashish shelar)