मुंबई: पत्रकार अर्णव गोस्वामी (arnab goswami) यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपने केलेल्या आंदोलनावरून शिवसेना नेते संजय राऊत ((sanjay raut ) यांनी टीका केली आहे. अर्णव प्रकरणी दिल्लीत काय हालचाली सुरू होत्या हे सत्य मी जर मांडलं तर सर्वांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामींना अटक केल्यानंतर दिल्लीत नेमकं काय घडलं? याबाबतचे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. (sanjay raut slams bjp over arnab goswami issue)
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अर्णव गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले. गोस्वामींना पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणि गोस्वामींच्या न्यायालयीन कोठडीचा संबंध काय?, असा सवाल राऊत यांनी केला. अर्णव गोस्वामींसाठी काल भाजप रस्त्यावर उतरली होती. अर्णव त्यांचे कार्यकर्तेच असावेत अशा आविर्भावात हे आंदोलन सुरू होतं. भाजपचे बडे नेतेही प्रतिक्रिया देत होते. याप्रकरणी काल दिल्लीत पडद्यामागून नेमक्या काय हालचाली सुरू होत्या, हे सत्य मांडण्याचा प्रयत्न जर मी केला तर सर्वांची पळता भुई थोडी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
काल भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. अर्णव त्यांचे कार्यकर्ते असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असतील. नाही तर ते रस्त्यावर उतरले नसते. कदाचित हा त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल. पण अर्णव यांना झालेली अटक हा चौथ्या स्तंभावर असलेला हल्ला आहे, असं मानायला पत्रकार तयार नाहीत. कारण हे प्रकरण पत्रकारितेशी संबंधित नसून आत्महत्येशी संबंधित आहे, असं ही त्यांनी सांगितलं.
अन्वय नाईक हे मराठी होते. त्यांनी अर्णव यांच्या स्टुडिओचं काम केलं. त्याचे पैसे त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्या शॉकने त्यांच्या 80 वर्षीय सासूबाईही गेल्या. त्यामुळे भाजपने आंदोलन करण्यापूर्वी या मराठी कुटुंबावर काय संकट कोसळलं होतं. हे पाह्यला हवं होतं. नाईक कुटुंबीयांच्या भावना समजून घेणाऱ्या व्यक्तिला मन असेल तर तो अशा प्रकारे रस्त्यावर उतरणाच नाही. भाजपने तर यापुढे मानवता आणि सत्य हे शब्दच वापरू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. रिया चक्रवर्ती, सुशांतसिंग राजपूत आणि अन्वय नाईक या दोन्ही प्रकरणात भाजपची भूमिका वेगवेगळी आणि दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला. (sanjay raut slams bjp over arnab goswami issue)
संबंधित बातम्या:
अर्णव गोस्वामींसह इतरांची रवानगी अलिबागमधील नगरपालिका शाळेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
अर्णव भाजपचे प्रवक्ते म्हणूनच भाजप रस्त्यावर; संजय राऊतांचा टोला
मोठी बातमी: अर्णव गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी
(sanjay raut slams bjp over arnab goswami issue)