तरुण नेत्याचं केंद्रीय सत्तेला आव्हान, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू; राऊतांनी भाजपला घेरले

| Updated on: Nov 10, 2020 | 10:29 AM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान दिलं आहे, असा टोला लगावतानाच बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू झाल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. (shivsena leader sanjay raut slams bjp over bihar election result)

तरुण नेत्याचं केंद्रीय सत्तेला आव्हान, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू; राऊतांनी भाजपला घेरले
Follow us on

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून त्यात तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने आघाडी घेतल्याचं चित्रं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान दिलं आहे, असा टोला लगावतानाच बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू झाल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. (shivsena leader sanjay raut slams bjp over bihar election result)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपला जोरदार टोले लगावले. बिहार निवडणुकीचे निकाल यायचे आहेत. काही कल मी पाहिले आहेत. त्यात तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतल्याचं चित्रं आहे. तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान दिलं आहे. बिहारमध्ये त्यांनी ताकद उभी केली असून सध्या तिथे कांटे की टक्कर सुरू आहे, असं राऊत म्हणाले.

बिहारमध्ये आता तेजस्वी पर्व सुरू होईल असं मानायला हरकत नाही, असं सांगतानाच भाजप आणि जेडीयूचा प्रचार केवळ बिहारच्या जंगलराज भोवती सुरू होता. पण 15 वर्षे बिहारमध्ये कोण सत्तेत होते? कुणाचं जंगलराज सुरू होतं? असा सवाल त्यांनी केला. निकाल आल्यानंतर लोक जंगल राज विसरून जातील आणि बिहारमध्ये मंगलराज सुरू होईल, असा चिमटाही त्यांनी काढला.

त्याआधी राऊत यांनी एक ट्विट करून भाजपला टोला लगावला होता. बादशाह तो वक्त होता है… इन्सान तो युं ही गुरुर करता है, असा टोला राऊत यांनी भाजपला नाव न घेता लगावला आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी केलेल्या या ट्विटमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

तर, तेजस्वी यादव यांचे बंधू तेजप्रताप यादव यांनीही ट्विट करून तेजस्वींना शुभेच्छा दिल्या होत्या. तेजप्रताप यादव यांनी ट्विट करून तेजस्वी भव: बिहार असं म्हणत तेजस्वी यादव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, काल तेजस्वी यादव यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने बिहारच्या रस्त्यारस्त्यावर त्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लागले होते. त्यात त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असाच करण्यात आला होता. निकालांच्या आधीच राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री घोषित करत पोस्टर्समधून शुभेच्छा दिल्या आहेत.

 

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 LIVE | जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची चिन्हं, लोजपसोबत 2005 पासूनच्या संघर्षाचा फटका?

नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी, धैर्यशील मानेंचा हल्लाबोल

Bihar Election Result 2020 LIVE: चिराग पासवान किंगमेकर ठरणार का? मतमोजणीचा ट्रेंड बदलला, भाजपची जोरदार मुसंडी

(shivsena leader sanjay raut slams bjp over bihar election result)