नवी दिल्ली: महाराष्ट्रात (Maharashtra ) महाविकास आघाडीच्या (MVA) प्रयोगाद्वारे शिवसेना (Shivsena), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन केली. शिवसेना यासाठी 2019 मध्ये एनडीएतून (NDA) बाहेर पडली. 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना यूपीएमध्ये (UPA) सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत लवकरच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत शिवसेना निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याची माहिती आहे. संजय राऊत, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना भेटणार आहेत. राऊत उद्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तर. बुधवारी प्रियंका गांधी यांची भेट घेतील.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी यूपीएवरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. ममता बॅनर्जींनी यूपीए आणि काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला सत्तेतून घालवायचं असल्यासं काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असल्याचं नमूद केलं होतं. यानिमित्तानं शिवसेना आणि काँग्रेसमधील जवळीक दिसून आली होती. आता शिवसेना खासदार संजय राऊत उद्या राहुल गांधी आणि बुधवारी प्रियंका गांधी यांची भेट घेणार असल्यानं शिवसेना यूपीएमध्ये मध्ये सहभागी होण्याच्या हालचाली वाढल्या असल्याची माहिती टीव्ही 9 मराठीला सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडी स्थापन करुन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताना शिवसेना एनडीए बाहेर पडली होती. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून शिवेसना राष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही आघाडीमध्ये सहभागी झाली नव्हती.
इतर बातम्या:
Shivsena likely to join UPA said by Sources Sanjay Raut will meet Rahul Gandhi and Priyanka Gandhi