ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, दाऊदशी संबंधित लोकांसोबत तुम्ही गेलात तेव्हा बाळासाहेबांना काय वाटलं असेल?, सुहास कांदेंचा ठाकरेंना सवाल

| Updated on: Jul 08, 2022 | 3:15 PM

ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, ज्यांचा दाऊदशी संबंध त्यांच्यासोबत तुम्ही गेलात तेव्हा बाळासाहेबांना काय वाटलं असेल?, असं सुहास कांदे म्हणाले आहेत.

ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, दाऊदशी संबंधित लोकांसोबत तुम्ही गेलात तेव्हा बाळासाहेबांना काय वाटलं असेल?, सुहास कांदेंचा ठाकरेंना सवाल
Follow us on

मुंबई : “उद्धव ठाकरेंचा मान ठेवतो. त्यांना प्रश्न विचारायचं आहे की ज्यांनी बाळासाहेबांचा उल्लेख टी बाळू असा केला, ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून जेव्हा तुम्ही बसलात, तेव्हा आम्हाला, बाळासाहेबांना वरती काही वाटलं नसेल का. ज्या दाऊदनी बॉम्बस्फोट केला, अनेक हिंदू मारले. हजारो लोक मेले. त्याच्याशी संबंधित नवाब मलिकच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता तेव्हा आम्हाला काही वाटत नसेल का. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना (Shivsena) काय वाटलं. मी तर भुजबळांच्या बाबत अनेकदा उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले होते. बाळासाहेबांचं हिंदुत्व कुठंय, असे अनेकदा त्यांना विचारलं”, असं म्हणत आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) प्रश्न विचारला आहे.

ठाकरे काय म्हणाले?

“ज्यांनी 2019 मध्ये दिलेला शब्द मोडला. शिवसेनेचा अपमान केला. विकृत शब्दांत माझ्यावर टीका केली आणि आज तुम्ही त्यांच्याचसोबत जाऊन बसलात. हे शोभनीय आहे का?”, असं म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाला टोला लगावला आहे. आमच्याबद्दलचं प्रेम हे अडीच वर्ष कुठे गेले होते. जे आमच्याशी अत्यंत वाईट पद्धतीने वागले त्यांना मिठ्या मारताना तुम्हाला आनंद वाटत असेल तर, तुमचा आनंद तुम्हाला लखलाभ असो. मी सर्वसामान्य शिवसैनिकांसोबत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“शिवसेना तर आम्ही वाढवण्याचं आम्ही करतोय आम्ही कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. शिवसेनेत आहोत, राहू, शिवसेनेचा अपमान केला नाही, करणार नाही. उद्धव, आदित्य ठाकरे, वहिनींचा अपमान केला नाही. आम्ही शिवसेना वाढवण्याचेच काम करतो आहे”, असं सुहास कांदे म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

“आदरणीय उद्धव साहेबांना चॅलेंज करायचं नाही, जनतेला आणि उद्धव यांना सांगायचं आहे की, चिन्हाशी भांडतो आहोत, पक्षाशी नाही. दोन तृतियांश मतं आमच्याकडे आहेत त्यामुळे ते आम्हाला मिळणार आहे”, असंur सुहास कांदे म्हणालेत.