मुंबई: ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं सांगत गुजराती बांधवांसाठी जिलेबी-फाफडाची मेजवाणी देण्याचा शिवसेनेचा बेत चांगलाच यशस्वी झाला आहे. शिवसेनेच्या या ‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’चं फलित म्हणून येत्या रविवारी 7 फेब्रुवारी रोजी 21 गुजराती उद्योगपती शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गुजराती उद्योगपतींच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेला आर्थिक बळ तर मिळणार आहेच शिवाय ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या व्होटबँकेला सुरुंग लावण्यातही शिवसेनेला यश मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (shivsena organises raas garba for gujarati community ahead bmc election)
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर असलेल्या गुजराती मतदारांना आकर्षिक करण्यासाठी शिवसेनेने मुंबईत ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी घोषणा देत जिलेबी, फाफडा आणि वडापावचा मुंबईत बेत आखला होता. या कार्यक्रमाला गुजराती बांधवांना बोलवण्यात आलं होतं. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह आणि कल्पेश मेहता यांच्या नेतृत्वात या भोजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला गुजराती बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता शिवसेनेने गुजराती बांधवांसाठी येत्या 7 फेब्रुवारी रोजी आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात गुजराती बांधवांसाठी रासगरबाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच याचवेळी 21 गुजराती उद्योजक आणि व्यावसायिकांना शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार आहे.
निवडणुकी आधी मोर्चेबांधणी
शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी गुजराती बांधवांसाठी येत्या ७ फेब्रवारी रोजी सायंकाळी 4 वाजता मालाडच्या सिल्व्हर ओक रेस्टॉरंटच्यावर लँडमार्क हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजित केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला आता एक वर्षाचा अवधी उरलांय. त्यामुळे शिवसेनेनं आता भाजपची व्होटबँक असलेल्या गुजरातीबहूल विभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन सुरू केलं आहे.
सलग दुसरा मेळावा
मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. शिवसेनेने या आधी 10 जानेवारी रोजी गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केला होता. ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ म्हणत शिवसेनेकडून गुजराती समाजासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. अंधेरी-ओशिवरा इथल्या गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये हा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात 100 गुजराती व्यापारी उपस्थित राहिले होते.त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना असल्यामुळे या कार्यक्रमात कोरोना नियमांचं पालन करण्यात येणार आहे. तसेच प्रथम येणाऱ्या शंभर लोकांनाच सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शिवसैनिकही उपस्थित राहणार असल्याचं हेमराज शाह आणि कल्पेश मेहता यांनी सांगितलं. (shivsena organises raas garba for gujarati community ahead bmc election)
VIDEO : मेट्रो शहरातील फास्ट न्यूज pic.twitter.com/FGLqo82zGt
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 2, 2021
संबंधित बातम्या:
माणूस अनुभवाने शिकतो, शिवसेनेच्या जिलेबी फापडा, उद्धव ठाकरे आपडावर काँग्रेसची प्रतिक्रिया
‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद
शिवसेनेची ‘स्नॅक्स डिप्लोमसी’; गुजराती मतांसाठी मेळाव्यात वडापाव-जिलेबी, फाफडाची फोडणी!
(shivsena organises raas garba for gujarati community ahead bmc election)