औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाही. वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री सक्षम आहेत, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच माझं ट्विट मुख्यमंत्र्यांना उद्देशून नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. (Shivsena Sanjay Raut Comment On Sanjay Rathod Resign)
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांना विचारलं असता ते काहीशे माध्यमांवर भडकलेले पाहायला मिळाले. संजय राठोड यांच्यावरील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री आहेत, तपास यंत्रणा आहे, पोलिस आहे, न्यायालय आहे. तुम्ही कशाला न्यायालयाच्या भूमिकेत जाताय, असा सवाल त्यांनी माध्यमांना विचारला. तसंच पुढे जाऊन वेट अँड वॉच, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री कोणत्याही दबावाला बळी पडत नाहीत. माझी आणि मुख्यमंत्र्यांची दररोज चर्चा होते. मला त्यांना कशाचीही आठवण करुन देण्यासाठी ट्विटची गरज नाही…
माझे ते मित्र आहेत, माझे ते मार्गदर्शक आहेत. माझी त्यांची दररोज चर्चा होते. अगदी आजही सकाळी माझी आणि त्यांची चर्चा झाली. त्यामुळे त्यांना मला काही सांगायचं असल्याचं ट्विटची गरज नाही.
“महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन”, असं लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो राऊत यांनी ट्विट केलं आहे. थोडक्यात मुख्यमंत्र्यांच्या वतीने राऊत यांनी ट्विट करत राठोड यांना एकप्रकारे इशारा दिल्याचं बोललं जातंय.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 28, 2021
कालही औरंगाबादेत बोलताना त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्यावर अगदी परखडपणे भाष्य केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे न्यायप्रिय नेते आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात ते संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील. ते कुणालही अन्याय करणार नाहीत आणि कुणाला पाठीशीही घालणार नाहीत, असं ते म्हणाले होते.
विधिमंडळ अधिवेशनाला आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक झाले आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यासाठी पुढचे 24 तास महत्वाचे असून पक्षानं त्यांना ‘निर्णय’ घेण्याच्या सुचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, असा पवित्रा भाजपने घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर मुख्यमंत्र्यांना राजीनाम्यासाठी आजचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजप सभागृहात आक्रमक अंदाजात दिसेल.
(Shivsena Sanjay Raut Comment On Sanjay Rathod Resign)
हे ही वाचा :
आता कोणत्याही क्षणी संजय राठोड यांची विकेट, संजय राऊत यांचे सूचक ट्विट