…मग धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याच प्रायोजन नाही, शिवसेना नेत्याचं मत

| Updated on: Dec 30, 2024 | 1:14 PM

"विमान येत नाहीत, असं नाही. इथून पुण्याची फ्लाईट चालू आहे. इथल्या लोकांचा संबंध मुंबईशी आहे. मुंबईची फ्लाइट चालू राहिली पाहिजे. उडान योजनेखाली काही सवलची मिळतात. ती सवलत मिळावी, पुन्हा लवकरात लवकर विमान सेवा चालू व्हावी"

...मग धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याच प्रायोजन नाही, शिवसेना नेत्याचं मत
dhananjay munde
Follow us on

“पोलीस तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे. कुठलाही आरोप धनंजय मुंडेंवर सिद्ध झाला नसेल, तर मग त्यांचा राजीनामा मागण्याच प्रायोजन नाही” असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. “कुठल्याही गोष्टीत राजकारण येतं. खरोखर कोणाचा संबंध असेल, तर त्या संदर्भात बोलणं योग्य आहे. आतापर्यंत जी आरोपींनी नाव जाहीर झालेली आहेत, ते फरार आहेत. आधी त्यांना अटक करावी लागले. त्यांची निपक्षपातीपणे चौकशी करावी लागेल” असं माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर म्हणाले. ते शिवसेना शिंदे गटाचे सावंतवाडीचे आमदार आहेत.

वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजड मुंडे तपासावर दबाव आणतील का? याकडे तुम्ही कसं पाहता? त्यावर दीपक केसरकर म्हणाले की, “आरोपी हा आरोपी असतो, तो कोणाचा मित्र नसतो, तो नातलग असेल तरी त्याला फारस महत्त्व नसतं. शेवटी आरोपीच नाव एकदा पोलिसांनी जाहीर केलं की, 100 टक्के त्याला अटक होणार, याबद्दल कुठलीही शंका बाळगू नका. यंत्रणा राज्याची असते, ती जिल्ह्यापुरता मर्यादीत नसते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी जाहीर केलय. लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे”

पर्यटन जिल्ह्यात विमान येत नाहीत, ही नामुष्की नाही का?

पर्यटन जिल्ह्यात विमान येत नाहीत, ही नामुष्की नाही का? त्यावर सुद्धा दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं. “विमान येत नाहीत, असं नाही. इथून पुण्याची फ्लाईट चालू आहे. इथल्या लोकांचा संबंध मुंबईशी आहे. मुंबईची फ्लाइट चालू राहिली पाहिजे. उडान योजनेखाली काही सवलची मिळतात. ती सवलत मिळावी, पुन्हा लवकरात लवकर विमान सेवा चालू व्हावी. इंडिगो, एअर इंडिया त्याचप्रमाणे काही छोट्या कंपन्या सुद्धा यात आल्या आहेत. त्यांची मध्यम आकाराची विमानं आहेत. मी सिंधुदुर्ग-मुंबई विमान सेवेसाठी पाठपुरावा करीन” असं दीपक केसरकर म्हणाले.

रिफायनरी झाली पाहिजे का?

रिफायनरी झाली पाहिजे का? या प्रश्नावर ते म्हणाले की, “एनरॉन प्रकल्प व्हायचा होता, तेव्हा सुद्धा मोठे मोर्चे निघाले. काजू, आंबा, मासेमारीवर परिणाम होणार असं सांगितलं गेलं. एनरॉन किती तरी वर्ष चालू होतं. त्याचा आंबा, काजू, मासेमारीवर कोणताही परिणाम झाला नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्याआधी वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. ग्रीन रिफायनरी होणार असेल, ती प्रदूषणमुक्त असेल, तर निश्चितच विचार झाला पाहिजे. वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे”