औरंगाबाद : शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांना वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावरील प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर न बोलता हात जोडले. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं टाळत त्यांनी कॅमेरासमोर हात जोडले. त्यामुळे संजय राठोड यांचा पाय आणखीनच खोलात असल्याचं पुन्हा एकदा अधोरेकित झालंय. (Shivsena Subhash Desai No Comment On Sanjay Rathod Case)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतो आहे. हरेक दिवशी नवनवे फोटो आणि ऑडिओ क्लिपबाहेर येत आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षही आक्रमक झाला असून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी देसाई यांना राठोड प्रकरणावर बोलतं करण्याचा प्रयत्न केला मात्र नो कमेंट म्हणून त्यांनी कॅमेरासमोर माध्यमांच्या प्रतिनिधींना हात जोडले आणि कुठलीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलं.
संजय राठोड प्रकरणाने शिवसेना बॅकफूटला गेल्याची चर्चा आहे. तसंच राठोड यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही दबाव वाढतो आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेसाठी राठोड प्रकरण अडचणीचं ठरलं आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा का?, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर तात्काळ उठत त्यांनी कॅमेरासमोर हात जोडले आणि काहीही न बोलता निघून गेले.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होतोना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये चांगलीच वाढ होतीय. अशा परिस्थितीत लोकांनी नियम पाळायला हवेत. जर नियम नाही पाळले तर लॉकडाऊन लागू शकतो, असं सूतोवाच सुभास देसाई यांनि केलं.
प्रियदर्शनी उद्यानात एकही झाड तोडले जाणार नाही, तसे शपथपत्र न्यायालयात आम्ही सादर करू आणि त्याची कडक अंमलबजावणी महापालिका प्रशासन करेल, असंही त्यांनी सांगितलं.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीबाबत मी निवडणूक आयोगाकडून माहिती घेतली. याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. त्याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
(Shivsena Subhash Desai No Comment On Sanjay Rathod Case)
हे ही वाचा :
सांगलीत पुन्हा राजकीय भूकंप? राष्ट्रवादीच्या धसक्याने भाजप नेत्यांच्या बैठका आणि फोनाफोनी