पालघर नगरपरिषदेत शिवसेनेला बहुमत, नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

पालघर : पालघर नगरपरिषदेच्या 28 जागांचे निकाल हाती आले आहेत. एकट्या शिवसेनेचे 14 नगरसेवक विजयी झाले आहेत. मात्र, बहुमत शिवसेनेकडे असला, तरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्वला काळे विजयी झाल्या आहेत. नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून आणण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रवादीला फायदा झाला आहे. पालघर नगरपरिषदेच्या एकूण 28 जागांसाठी निवडणूक पार पडली. निकाल : शिवसेना : 14 नगरसेवक भाजप : […]

पालघर नगरपरिषदेत शिवसेनेला बहुमत, नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा!
Follow us on

पालघर : पालघर नगरपरिषदेच्या 28 जागांचे निकाल हाती आले आहेत. एकट्या शिवसेनेचे 14 नगरसेवक विजयी झाले आहेत. मात्र, बहुमत शिवसेनेकडे असला, तरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्वला काळे विजयी झाल्या आहेत. नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून आणण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रवादीला फायदा झाला आहे.

पालघर नगरपरिषदेच्या एकूण 28 जागांसाठी निवडणूक पार पडली. निकाल :

  • शिवसेना : 14 नगरसेवक
  • भाजप : 07 नगरसेवक
  • आघाडी (काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस+ बविआ) : 02 नगरसेवक
  • अपक्ष : 05 नगरसेवक
  • नगराध्यक्ष : उज्वला काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)

शिवसेना-भाजप युतीने पालघर नगरपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसला. तरीही शिवसेनेला 28 पैकी 14 म्हणजे निम्म्या जागा जिंकता आल्या. मात्र, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगरसेवकपदाच्या 28 जागांसाठी 87 उमेदवार रिंगणात होते. मतदानाआधीच एक शिवसेनेचा उमेदवार, तर एक भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून आयात केलेल्या श्वेता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला काळे, तर  शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार अंजली पाटील, असे तीन उमेदवार उभे होते. त्यापैकी राष्ट्रवादीच्या उज्वला काळे विजयी झाल्या. पालघर नगरपरिषद शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र बंडखोरी शिवसेनेला नगराध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं आहे.