IPL सामन्यादरम्यान जयपूरमध्ये ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

जयपूर : राजस्थानमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये आयपीएलचा सामना झाला. या रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव केला. मात्र, सामन्यादरम्यान मैदानावर ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘चौकीदार चोर है’च्या घोषणांचा हा व्हिडीओ […]

IPL सामन्यादरम्यान जयपूरमध्ये ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा
Follow us on

जयपूर : राजस्थानमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये आयपीएलचा सामना झाला. या रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव केला. मात्र, सामन्यादरम्यान मैदानावर ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘चौकीदार चोर है’च्या घोषणांचा हा व्हिडीओ फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. पंजाबचे काँग्रेस नेते आणि आमदार अमरिंदर सिंह राजा यांनीही मंगळवारी सकाळी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. अमरिंदर सिंह यांनी व्हिडीओसोबत ‘‘चौकीदार की खुल गई पोल, बीच मैच, मच गया शोर… “चौकीदार चोर है…!” हे कॅप्शन दिले आहे.

राहुल गांधींनी दिलीय चौकीदार चोर हैची घोषणा

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल व्यवहारप्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांनी अनेकदा पंतप्रधान मोदींना उद्देशून ‘चौकीदार चोर है’ची घोषणा दिली. त्यानंतर ही घोषणा प्रसिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही विरोधी पक्षांच्या महारॅलीत हीच घोषणा दिली होती. दुसरीकडे पंतप्रधान मोदी मात्र स्वतःला देशाचा चौकीदार असल्याचे म्हणत आहे.

भाजपकडून ट्विटरवर चौकीदार अभियान

भाजपने काँग्रेसच्या या घोषणेनंतर ट्विटरवर एक अभियान राबवले आहे. यात भाजपच्या जवळजवळ सर्व नेत्यांनी या अभियाना अंतर्गत सोशल मीडियावर आपल्या नावापुढे चौकीदार हा शब्द लावला आहे. या अभियानात सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर आपल्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला होता. त्यानंतर भाजपच्या जवळजवळ सर्वच नेत्यांनी आपल्या नावात बदल केले.