Mohit Kamboj | तपास यंत्रणांच्या निशाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 नेते कोण? भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर काल आणि आज काय म्हणाले?

| Updated on: Aug 20, 2022 | 12:11 PM

तपास यंत्रणांच्या निशाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते असल्याचं वक्तव्य करून शुक्रवारी रणजितसिंह निंबाळकर यांनी खळबळ माजवली. शनिवारी याविषयी आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असल्यास त्यांनी स्पष्ट बोलणे टाळले.

Mohit Kamboj | तपास यंत्रणांच्या निशाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 नेते कोण? भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर काल आणि आज काय म्हणाले?
रणजितसिंह निंबाळकर, खासदार भाजप
Image Credit source: social media
Follow us on

सोलापूरः भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याविरोधात तपास यंत्रणा कारवाई करत असल्याचं ट्विट केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. कंबोज यांच्या ट्विटचा रोख अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे आहे का, असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र भाजपच्याच एका बड्या नेत्याने यासंदर्भातील आणखी एक वक्तव्य केल्याने नव्याच चर्चा होऊ लागल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच मोठ्या नेत्यांचा ईडीची नोटीस येणार असल्याचं भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsingh Nimbalkar) यांनी काल केलं. जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा समावेश असल्याचा दावा निंबाळकर यांनी शुक्रवारी बोलताना केला. मात्र आज टीव्ही 9 च्या प्रतिनिधींनी पुन्हा एकदा त्यांना यावर स्पष्ट प्रतिक्रिया विचारली असता गोपनीयतेचा भंग होईल, म्हणून आताच मी यावर काहीही बोलणार नाही, असं वक्तव्य निंबाळकरांनी केलं..

शुक्रवारी निंबाळकर काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक चोर आहेत. आता मोहित कंबोज यांना कोणता नेता सापडला, हे त्यांच्याशी बोलल्यानंतरच कळेल. सुप्रीम कोर्टाने लवासावरून फटकारलं आहे. त्या काळातले जलसंपदा मंत्री कोण होते, जमिनी कशा दिल्या, त्याचे निकष काय, १४ वर्ष चाललेल्या खटल्यातही सुप्रीम कोर्टाने समन्स बजावला आहे. त्यामुळे याच विषयावर का अन्य विषयावर चौकशी होते, हे पहावं लागेल.

हे सुद्धा वाचा

जलसंपदा विभागात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर आरोप आहेत. राष्ट्रवादीतल्या 10 नेत्यांपैकी 5 नेत्यांची चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे. यात काही आमदार, मंत्री, खासदारांचा समावेश आहे. आता देशपातळीवरील यंत्रणा ईडी किंवा सीबीआय मार्फत याची चौकशी केली जाईल, त्यानंतरच नावे उघडकीस येतील, असं वक्तव्य रणजितसिंह निंबाळकर यांनी केलंय.

शनिवारचं वक्तव्य काय?

तपास यंत्रणांच्या निशाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते असल्याचं वक्तव्य करून शुक्रवारी रणजितसिंह निंबाळकर यांनी खळबळ माजवली. शनिवारी याविषयी आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असल्यास त्यांनी स्पष्ट बोलणे टाळले. राष्ट्रवादीच्या या नेत्यांमध्ये माढा मतदार संघातील नेत्यांचा समावेश आहे का, असं विचारल्यावर आताच यावर बोलणं हा गोपनीयतेचा भंग होईल, असे निंबाळकर म्हणाले.