नवी दिल्ली : सातव्या टप्प्यातील मतदान सुरु असताना, मोदी देवदर्शनात मग्न आहे. पण त्याचवेळी विरोधीपक्षांनी मात्र निकालानंतरची जुळवाजुळव सुरु केल्याचं चित्रं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे विरोधकांना एकत्र आणण्याचं काम करत आहेत. चंद्राबाबू गटातटात विखुरलेल्या विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही, तर अशा परिस्थितीत चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
बातमीतील महत्त्वाचे मुद्दे :
लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्व मोदीविरोधक एकत्र येणार अशी जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादवांनी आघाडी करत काँग्रेसला एकाकी पाडलं. तर तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता आणि काँग्रेसमध्ये बेबनाव कायम राहिला. पण आता निवडणूक संपल्यानंतर सर्व विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे आणि विरोधकांना एकत्र आणण्याची धडपड करत आहेत, ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू.
एनडीएतून बाहेर पडल्यापासून चंद्राबाबू नायडूंनी मोदी आणि भाजपविरोधात रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी मोदी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी धडपड केली होती. आता निकालाच्या तोंडावर चंद्राबाबू पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र आणण्यासाठी सक्रीय झाले आहे. सातव्या टप्प्यातील प्रचारांची सांगता होताच, चंद्राबाबूंनी विरोधी पक्षातील वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.
चंद्राबाबूंनी गेल्या दोन दिवसात कुणा-कुणाच्या भेटी घेतल्या?
विशेष म्हणजे, रविवारी (19 मे) सलग दुसऱ्या दिवशी चंद्राबाबू नायडूंनी दिल्लीत विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत, सत्तेची गणित जुळवण्याचे प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.
निकालाच्या दिवशी चंद्राबाबूंच्या मॅरेनथॉन बैठका
विशेष म्हणजे, दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास चंद्राबाबूंनी सोनिया गांधींचीही भेट घेऊन निकालानंतरच्या स्थितीवर खलबतं केली. त्यामुळे चंद्राबाबूंचा हा भेटींचा सिलसिला, त्यांची रणनिती स्पष्ट करतो. भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिल्यास, सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी चंद्राबाबू जोरदार प्रयत्न करतत आहेत.
विरोधकांमधील मतभेद, मनभेद दूर करून केवळ मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चंद्राबाबूंचे प्रयत्न आहेत. त्यामुळे 2019 मध्ये भाजप किंवा काँग्रेसला बहुमत न मिळाल्यास तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून चंद्राबाबू केवळ किंगमेकर ठरणार, हे निश्चित.
कोण आहेत चंद्राबाबू?
चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख आहेत. आंध्रप्रदेशच्या चंद्रागिरी मतदारसंघातून काँग्रेसमधून 1978 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1982 मध्ये तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली. 1 सप्टेंबर 1995 मध्ये चंद्राबाबू नायडू हे पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. 1995 ते 2004 मध्ये संपूर्ण आंध्रप्रदेशचे ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2004 ते 2014 पर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेते पद भूषवले. त्यानंतर 2014 साली पुन्हा एकदा आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.