‘सरकारकडून स्पष्ट भूमिका येत नाही तोवर ‘लालपरी’चं चाक फिरणार नाही’, परब-पवारांच्या बैठकीनंतरही पडळकर ठाम

| Updated on: Nov 22, 2021 | 3:59 PM

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात जवळपास अडीच तास बैठक पार पडली. या बैठकीत अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती परब यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यावरुन आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

सरकारकडून स्पष्ट भूमिका येत नाही तोवर लालपरीचं चाक फिरणार नाही, परब-पवारांच्या बैठकीनंतरही पडळकर ठाम
गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
Follow us on

मुंबई : राज्यात 28 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. तर मागील भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांसह 13 दिवसांपासून आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात जवळपास अडीच तास बैठक पार पडली. या बैठकीत अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती परब यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यावरुन आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. (Gopichand Padalkars Warning that ST workers’ agitation will continue on Azad Maidan)

आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज 13 वा दिलस आहे. तरीही कुठला निर्णय होत नाही म्हणल्यावर हे सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होतं. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांशी संबंधित हा विषय आहे. असं असतानाही साधी बैठक घ्यायला पवारांना 25 दिवस लागले. या बैठकीतही कुठला निर्णय नाही. त्यावरुन हे निर्णयक्षम सरकार नाही, त्यांच्यात एकमत नसल्याचं स्पष्ट होतं, अशी खोचक टीका पडळकर यांनी केलीय.

‘सरकार कोर्टाचा दाखला देण्याशिवाय काही करत नाही’

विलिनीकरणाच्या मागणीबाबत विचारलं असता, कोर्टानं नेमलेल्या समितीबाबत परबांचं जे वक्तव्य आहे तेच कायम आहे. त्यापुढे जायला ते तयार नाहीत. सरकारनं अजून भूमिकाच घेतलेली नाही. मात्र, कर्मचाऱ्यांची भूमिका स्पष्ट आहे. सरकार कोर्टाचा दाखला देण्याशिवाय काही करत नाही. शेवटी आमच्या हातात काय आहे? आमच्या हातात काही असतं तर आम्ही 13 दिवस इथं थांबलो असतो का? असा सवालही पडळकर यांनी केलाय.

‘..म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत’

शरद पवार यांनी 50 वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व केलंय. मान्यताप्राप्त संघटना त्यांचीच आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांना सगळ्या संघटनांना बाजूला केलंय. त्यामुळे यांची पोळी भाजली जाणार नसल्याची चिंता यांना लागली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवला त्यातून यांना काही मिळणार नाही. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येत नसल्याचा गंभीर आरोपही पडळकर यांनी केलाय.

पवार-परबांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

दरम्यान, अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आजच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यातील कोणताही मुद्दा आता सांगण्यासारखा नाही. त्यावर अभ्यास करुनच निर्णय घेतला जाईल. कर्मचाऱ्यांचं समाधान कसं करता येईल, यावर या बैठकीत चर्चा झाली. कर्मचारी आणि प्रवासी या दोघांच्याही सोयीचा पर्याय काढला जाईल. वेगवेगळे मार्ग आहेत. त्या सगळ्यांवर चर्चा नाही. निश्चित कुठल्याही निर्णयावर येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असंही पडळकर म्हणाले. तसंच वेतनवाढीचा प्रश्नही चर्चिला गेला. अन्य राज्यांचा आणि आपल्या राज्यातील पगार यावर चर्चा झाल्याची माहिती परबांनी दिली.

इतर बातम्या :

ST Strike| पवार-परबांची साडेचार तास बैठक; कोणताही ठोस निर्णय नाही, संपाचा तिढा कायम!

राज्यातील दंगलींच्या चौकशीसाठी ठाण्यात भाजपची निदर्शनं, निरंजन डावखरेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Gopichand Padalkars Warning that ST workers’ agitation will continue on Azad Maidan