“चोर घराच्या मागच्या भिंतीवरुन चढला होता. चार माळ्याची बिल्डिंग आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमधून त्याचा चेहरा समोर आलाय. सीसीटीव्ही कमी प्रमाणात होते. चोराला शोधण्यासाठी इन्फॉर्मसना फोटो दिले आहेत. यात कुठल्याही गँगचा अँगल नाही” असं गृह राज्य मंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलय. सैफ अली खानच्या घरात काल रात्री चोर घुसला होता. त्याच्या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी हल्ल्यासंबंधी माहिती दिली आहे.
विरोधी पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी सैफ अली खानवरील हल्ल्यामागे कट्टरपंथींयाच्या अँगलची शक्यता व्यक्त केलीय. त्यावर योगेश कदम यांनी उत्तर दिलं. “फक्त सैफ अली खानच आडनाव खान आहे म्हणून विरोधक राजकारण करत असतील, तर मला त्यांची कीव येते. महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला विरोधी बाकांवर बसवलेलं आहे. काही बरळाल, तर आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. या घटनेला सामाजिक, धार्मिक रंग देण्यातून जितेंद्र आव्हाड यांनी परिपक्तवता लक्षात येते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गृहखात काम करत असून मुंबई हे जगातील सुंदर शहर म्हणून ओळखलं जातं” असं योगेश कदम म्हणाले.
त्यामुळे डेटा मिळायला उशीर
चोराने रेकी केली होती का? या प्रश्नावर योगेश कदम म्हणाले की, “पहिलं म्हणजे तिथे पोलीस खात्याची सुरक्षा नव्हती. खासगी सुरक्षा होती. सैफच घर चार मजली आहे. तिथे सीसीटीव्ही फुटेज फार नव्हतं. त्यामुळे डेटा मिळायला उशीर झाला. एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. या सगळ्याला गँगचा, धार्मिक रंग देणं चुकीच आहे. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी चोरीचा अंदाज व्यक्त केलाय”
अजून योगेश कदम काय म्हणाले?
“फॉरेन्सिकने पुरावे गोळा करुन लॅबमध्ये पाठवले आहेत. हत्येच्या इराद्याने चोर आत शिरला असं वाटतं नाही. एखादा अनोळखी व्यक्ती घरी आल्यानंतर आपण त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. तशा झटापटीतून हे घडलं असावं. मी विरोधकांना सांगेन या घटनेचा आधार घेऊन मुंबई, बॉलिवूडमध्ये भितीच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका” असं मंत्री योगेश कदम म्हणाले.