मुंबई : राज्यात एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मोठी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकार कोसळवले. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर बरेच दिवस मंत्री मंडळ विस्तार रखडला होता. मंत्री मंडळ विस्तार रखडल्याने एकनाथ शिंदे सरकारला टार्गेट केले जात होते. आज शेवटी राज्यात मंत्री मंडळ विस्तार करण्यात आला असून भाजपा आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी आज मंत्री (Minister) पदाच्या शपथ घेतल्या आहेत.
भाजपामधून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंदक्रांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीष महाजन, डाॅ. सुरेश खाडे, अतूल सावे, मंगलप्रभात लोढा, रविंद्र चव्हाण यांना मंत्री पदाच्या संधी मिळालीयं. मंत्री मंडळ विस्तारच्या पहिल्या टप्प्यामध्ये भाजपाच्या एकून नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतलीयं. गिरीष महाजन हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. गिरीष महाजन आणि एकनाथ खडसेमधील संघर्ष राज्याने पाहिला आहे. त्यामध्येच आता एकनाथ खडसे हे एनसीपीमध्ये गेले आणि गिरीष महाजन यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडल्याने आता संघर्ष वाढणार हे नक्कीच आहे.
आज मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार झालायं. यात विधान परिषद सदस्यांचा समावेश करण्यात आला नाहीयं. तर शिंदे गटाकडे एकही विधान परिषदेचा अधिकृत आमदार नाही. सामान्य प्रशासन, नगर विकास, उद्योग, कृषी ही खाती शिंदे गटाकडे राहणार असल्याची चर्चा आता रंगताना दिसत आहे. तर गृह, वित्त, महसूल, सार्वजनिक बांधकाम ही खाती भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. गृह आणि वित्त ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहतील, अशी चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांनी राज्यात मोठी बंडखोरी करत आपल्यासोबत तब्बल 40 आमदार घेतले. त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने राज्यात सत्तास्थापन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्या. मात्र, 16 आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला होता. आज राज्यात मंत्री मंडळ विस्तार झाला असून भाजपाच्या तब्बल 9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ ही घेतलीयं. आता कोणाला नेमके कोणते खाते मिळते हे पाहण्यासारखेच ठरणार आहे.