Raigad loksabha election : रायगड लोकसभेसाठी अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूनं आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होताच सुनिल तटकरेंना विरोधकांनी घेरले आहे. भविष्यात अजितदादांकडून भाजपात पहिली उडी मारणारे तटकरेच असतील. असा दावा
रोहित पवारांनी केला आहे.
2019 ला तटकरेंना 4,86,968 तर शिवसेनेच्या गीतेंना 4,55,530 मतं पडली होती. तटकरेंनी गीतेंचा 31,438 मतांनी पराभव केला होता. मात्र तटकरेंच्या विजयात श्रीवर्धन आणि शेकापचे आमदार असलेल्या जयंत पाटलांच्या अलिबागचा वाटा होता. तटकरेंचा 31,438 मतांनी विजय झाला होता. त्यात श्रीवर्धन तालुक्यानं दिलेलं लीड 37,877 मतांचं होतं.
मात्र गेल्यावेळी तटकरेंसोबत गुहागरचे भास्कर जाधव, अलिबागमध्ये शेकापचे जयंत पाटील सोबत होते. अनंत गीतेंसोबत दापोलीचे योगेश कदम, महाडचे भरत गोगावले होते. यावेळी तटकरेंसोबत महायुतीत योगेश कदम तर महाडचे गोगावले आहेत. तर मविआत अनंत गीतेंसोबत भास्कर जाधव आणि शेकापचे जयंत पाटील असणार आहेत. त्यामुळे आता विजय कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. मुंबईला लागून असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात देखील चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. रायगड मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी मतदान होणार आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसघांचा समावेश आहे. प्रशासनाकडून येथे तयारीला सुरुवात झाली आहे.