Nupur Sharma: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्यावर सुप्रीम कोर्टाने मोठी टीका केलीये. सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा (Supreme Court On Nupur Sharma) यांना संपूर्ण देशाची माफी मागण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर उदयपूरमधील घटना तिच्यामुळेच घडली असल्याचंही कोर्टाने म्हटलंय. उदयपूरमध्ये कन्हैयालाल (Udaipur Kanhaiyalal) नावाच्या एका हिंदूची दोन धर्मांधांनी गळा चिरून निर्घृण हत्या केली. याआधी हत्येच्या वेळी आणि हत्येनंतरही आरोपींनी एक व्हिडिओ तयार केला होता की, “गुस्ताख-ए-रसूलच्या याच शिक्षेमुळे डोकं धडापासून वेगळं झालं, कन्हैयालालला नुपूर शर्माला पाठिंबा दिल्याबद्दल शिक्षा झाली आहे”, असं कन्हैयालालची हत्या करणारे आरोपी म्हणाले.आता ही हत्या नुपूर शर्मामुळेच झाल्याचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे.
मोहम्मद पैगंबर यांच्यावर नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. नुपूर यांच्या बदली अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातील लोकांच्या भावना भडकल्या आहेत.आज देशात जे काही घडतंय त्याला ती जबाबदार आहे. आम्ही टीव्हीवरील वादविवाद पाहिले असून, नुपूरला भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे कोर्टाने म्हटले आहे. पण त्यानंतर ती जे बोलली ते अधिकच लज्जास्पद आहे.
तिने आणि तिच्या हलक्या जिभेने देशाला आग लावली आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. उदयपूरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेला ती जबाबदार आहे. जेव्हा वकिलाने माफीनामा आणि पैगंबरांवर केलेली टिप्पणी नम्रतेने मागे घेण्याची विनंती केली तेव्हा खंडपीठाने सांगितले की मागे घेण्यास खूप उशीर झाला. या तक्रारीवरून एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. मात्र अनेक एफआयआर असूनही त्यांना दिल्ली पोलिसांनी अद्याप हातही लावलेला नाही.
नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर देशातील अनेक भागात निदर्शने झाली. एवढेच नाही तर महाराष्ट्रासह अनेक राज्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याचवेळी नुपूर शर्मा यांनी सर्व प्रकरणे दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जावे. त्यांनी याचिका मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.