malvan shivaji maharaj statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा असलेला पुतळा कोसळला. हा पुतळा शिल्पकार जयदीप आपटे यांनी उभारला होता. यावरुन आता राजकारण तापू लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात नितेश राणे यांनाचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. नितेश राणे हे आपटे यांच्या स्टुडिओत जात होते. जयदीप आपटे यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी नितेश राणे यांनीच प्रयत्न केले, असा आरोप त्यांनी केला.
सुषमा अंधारे यांनी यावेळी राणे कुटुंबियांवर आरोप केले. ते म्हणाले, संस्कार नसलेल्या कुटुंबाबाबत काय भूमिका घ्यायची हे देवेंद्र फडणवीस यांना सांगावे लागेल. नारायण राणे आणि नितेश राणे यांचा मग्रुरपणाला देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्त आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र शांत राहून द्यायचा नाही. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील लेकींना सुरक्षित ठेवायचा नाहीत.
पुतळ्याच्या प्रकरणात जयदीप आपटेच्या ऐवजी जावेद अन् अक्षय शिंदेच्या ऐवजी अक्रम शेख असता तर नितेश राणेने कसा थयथयाट केला असता. नितेश राणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.
आता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, हे नौसेनेचे काम होते. मग त्या कामाचे क्रेडीट घेताना ते का? बोलला नाही. त्यांना आता राजनाथ सिंह यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे आहे? आता राज्याचे कलासंचलन म्हणतेय आम्ही फक्त सहा फुटांची परवानगी दिली होती. परंतु सरकारने इंटरनॅशनल इव्हेंटसाठी घाईघाईने पुतळा उभा केला. त्यांना फक्त आणि फक्त लोकसभेचे निवडणूक डोळ्यासमोर दिसली. हा खेळ शिवप्रेमींच्या भावनांचे आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
अजित पवारांनी माफी मागितली. आम्ही अजित पवार यांच्या त्या निर्णयाचे स्वागत करतो. त्यांनी या प्रकरणात सरकारमध्ये असून वेगळी भूमिका घेतली आहे. या पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? त्या ठिकाणी पुतळ्याला खर्च केला दीड कोटी आणि हेलिपॅडला खर्च केला सव्वादोन कोटी, असा आरोप अंधारे यांनी केला.