देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फोडण्याचा प्लॅन आखला तर सर्वात आधी ‘हा’ नेता भाजपात जाणार!- सुषमा अंधारे

| Updated on: Dec 25, 2022 | 3:06 PM

सुषमा अंधारे यांनी शिंदेगट आणि भाजपवर टीका केली आहे...

देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फोडण्याचा प्लॅन आखला तर सर्वात आधी हा नेता भाजपात जाणार!- सुषमा अंधारे
Follow us on

सोलापूर : सोलापूरमध्ये बोलताना शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदेगट आणि भाजपवर टीका केली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदार फोडण्याचा प्लॅन आखला तर सर्वात आधी शिंदेगटाचा बडा नेता भाजपात जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

फडणवीसांनी आमदार फोडण्याचा प्लॅन आखला तर सर्वात अगोदर शहाजी पाटील भाजपात जाणार, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

आमदार शहाजी बापूंनी खास्ता खाल्ल्या. लोक भावनेमुळे 1995 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. या वेळी तर फक्त 768 मतांनी ते निवडून आलेत. पण 2024 ला त्यांची विकेट नक्की पडणार आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

“32 वर्षांच्या आदित्य ठाकरेंच्या बोलण्याने सत्ताधारी मंडळीचे धाबे दणाणलेत, म्हणून त्यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवली जात आहे”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी शिंदेगट-भाजपवर हल्लाबोल केलाय.

गणपतराव देशमुख 11 वेळा आमदार झाले. पण कसलीही संपत्ती कमवली नाही. शहाजूबापू पाटील मात्र जाणूनबुजून डायलॉगच्या क्लिप व्हायरल करत आहेत. शहाजीबापू उत्तम अभिनय करतात. त्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं शहाजीबापू म्हणालेत.

वसंतदादा सुतगिरणीच्या कारभाराचं काय झालं? पतंगराव कदम पतसंस्थेचं काय झालं? राधकृष्ण दुध उत्पादक संघ-कुकुटपालन संस्थेचं काय झालं?, या प्रश्नांची उत्तरं शहाजीबापूंनी देणं आवश्यक आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

जून महिन्यात शहाजीबापू हॉटेल आणि डोंगार पाहून गुवाहटीला गेले. 50 खोके घेऊन त्यांची नियत बदलली, असं अंधारे म्हणाल्या आहेत.

बापूंना अजुन मंत्रिपद दिलं गेलेलं नाही. म्हणून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचं काम मुख्यमंत्री शिंदेंकडून करून घेतील. शहाजीबापूंच्या गावाला जाणारा रस्ताची चाळण झाली आहे. त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.