इस्लामिक धर्मगुरु तौकीर रजा खान यांनी मुस्लिमांना रविवारी एकजूट होऊन दिल्लीला घेराव घालण्याच आवाहन केलं आहे. तौकीर रजा खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. “आपली मागणी मान्य करुन घ्यायती असेल, तर सर्व मुस्लिमांनी एकजूट होऊन दिल्लीला घेराव घातला पाहिजे” असं मुस्लिम धर्मगुरु आणि इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे प्रमुख तौकीर रजा यांनी म्हटलं आहे. तौकीर रजा जयपूरमध्ये एक वक्तव्य केलय. तौकीर रजा यांनी यावेळी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केलं. ‘
“कोणाच्या बापाची औकात नाही की आमची संपत्ती जप्त करेल. आमची संख्या का लपवता? ज्यादिवशी आम्ही रस्त्यावर उतरु, त्या दिवशी तुमचा आत्मा कापेल. आमते तरुण घाबरट नाहीत. आम्ही आमच्या तरुणांना नियंत्रणात ठेवलं आहे. ज्या दिवशी ते तुमच्या नियंत्रणाबाहेर जातील, त्यांना रोखणं तुमच्या अवाक्यातली गोष्ट नसेल” असं तौकीर रजा यांनी म्हटलं आहे.
‘आपली संपत्ती ताब्यात घेण्याची कोणाच्या बापामध्ये ताकद नाही’
“संसदेच सत्र सुरु होतय. जर, तुम्हाला तुमची ताकद दाखवायची असेल, तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी करुन हव्या असतील तर तुम्हाला दिल्लीला यावं लागेल” असं तौकीर रजा म्हणाले. ते उत्तर प्रदेशातील धर्मगुरु आहेत. “तुम्ही दिल्लीत येऊन तुम्हाला जे हवं ते मिळवण्याचा प्रयत्न केला, तर तसं घडेल. पण जर तुम्ही देखावा करत बसाल, तर काही होणार नाही. सरकार बेईमान आहे. कुरान आणि अल्लाहच अपमान करणार सरकार सत्तेवर आहे. जर, तुम्हाला त्रास होत असेल, तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही दिल्लीला या, माझी विनंती आहे. आपली संपत्ती ताब्यात घेण्याची कोणाच्या बापामध्ये ताकद नाही” असं तौकीर रजा म्हणाले.
‘तुमचा आत्मा कापेल’
“आम्ही आधी तिरंगा घेऊन येणार. जर ते ऐकले नाहीत तर प्रशासनाकडे जाणार. त्यानंतर जे होईल, ते ठरवण तुमची जबाबदारी असेल. आमची संख्या का लपवता? ज्या दिवशी रस्त्यावर उतरु तुमचा आत्मा कापेल” असं तौकीर रजा म्हणाले.