“अमित शाह हे गांडा भाई आहेत. महाराष्ट्राला अशा दादा भाईंची गरज नाही. गुजरातमधून आलेल्या गांडा भाईची तर अजिबात गरज नाही. तुमच्या हातात सत्ता, पैसा केंद्रीय यंत्रणा आहेत, म्हणून तुम्ही भाई आहात. ही सगळी आयुध गळून पडल्यावर, तेव्हा भाईगिरी करा आमच्याशी” असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिलं. “पोलीस यंत्रणा, सीबीआय, ईडी आज तुमच्या हातात आहे. विरोधकांना जेरबंद करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करताय, तरीही महाराष्ट्राने तुमचा पराभव केला. महाराष्ट्राने उडवून लावलं एकदिवस हे सगळं बाजूला ठेऊन समोर या” असं संजय राऊत म्हणाले.
“अमित शाह यांना जंजीर सिनेमा बघायला सांगा वर्दीची, केंद्रीय यंत्रणेची मस्ती आहे. म्हणून तुमची मस्ती आहे. महाराष्ट्र सगळ्याचा माज उतरवणारं राज्य आहे. महाराष्ट्राचे दोन पिढीजात धंदे आहेत, एक देशाच संरक्षण करणं आणि माजोरड्यांचा माज उतरवणं” असं संजय राऊत म्हणाले. “ही महाराष्ट्राची खासियत याहे. त्यांना उतरवून घ्यायचं असेल, तर त्यांनी जरुर यावं” असं संजय राऊत म्हणाले.
‘आनंद दिघेंना बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न’
धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार. सत्य घटनेवर आधारीत सिनेमा असेल तो सर्वांना आवडेल असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “धर्मवीरांची व्याप्ती काय होती? हे आम्हाला माहित आहे. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही. आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. भाजपाच्या मदतीने त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न होतो आहे. बाळासाहेब ठाकरेंचे महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक एकनाथ शिदेंना मानत नाहीत, म्हणून सिनेमाच्या माध्यमातून नवीन प्रतिक निर्माण केली जात आहेत”
‘मग असे सिनेमा काढण्याची गरज पडली नसती’
“आनंद दिघे निष्ठावंत, जिल्हाप्रमुख होते. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी पुढे असायचे. दुर्देवाने त्यांचं अकाली निधन झालं. शिंदेंपेक्षा राजन विचारे आनंद दिघेंच्या जवळ होते. धर्मवीरांवर काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा त्यांच्यासारखी शिवसेनेप्रती निष्ठा बाळगली असती, तर असे सिनेमे काढून डंका पिटवण्याची वेळ आली नसती” अशी टीका संजय राऊत यांनी केली.