Uddhav Thackeray : आज महाराष्ट्राच्या या पट्टयात ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का

| Updated on: Jan 09, 2025 | 1:19 PM

Uddhav Thackeray : महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांच्या गटासमोरची आव्हान वाढत चालली आहेत. लोकांचा नेतृत्वावरील विश्वास कमी होत चालला आहे. दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच प्रमाण वाढत आहे. आज महाराष्ट्राच्या एका पट्टयात ठाकरे गटाला फटका बसणार आहे.

Uddhav Thackeray : आज महाराष्ट्राच्या या पट्टयात ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर गटाला लागलेली गळती कशी रोखायची? हेच आजच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्यासमोरच सर्वात मोठ आव्हान आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना कोणाची? हा निकालाच्या माध्यमातून कौल दिला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे राज्यभरात 57 आमदार निवडून आले. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे फक्त 20 आमदार जिंकू शकले. त्यामुळे सध्या शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

आज उद्धव ठाकरे गटाला ठाणे, भिवंडी, शहापूर,पालघर या पट्ट्यात मोठा फटका बसू शकतो. कारण या पट्ट्यातील जिल्हा प्रमुख ,नगरसेवक ,जिल्हा परिषद सदस्य,पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश करणार आहेत. फक्त ठाकरे गटच नाही, तर इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी सुद्धा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात संध्याकाळी साडेचार वाजता हा पक्ष प्रवेश होणार आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे.

अजून कुठे फटका बसला?

परवा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. माजी पंचायत समिती सदस्य, माजी उपसरपंच यांसह 30 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पाडला. पुण्यातही उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला. पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नांदेडमध्ये सुद्धा असच झालं. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माधव पवाडे आणि अविनाश घाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

कुठल्या निवडणुका लागणार?

पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. यामध्ये पंचायत समिती, नगर पालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकींचा समावेश आहे.